भारतात साजरया केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. पाच दिवसांच्या दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस ज्याला आपण दिवाळी असे हि म्हणतो. या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि योग्य चालीरीती रिवाजात माता लक्ष्मी श्री गणेश भगवान आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते.
या देविदेवताना आमंत्रित केले जाते. घरात नेहमीसाठी वास करण्याचे आवाहन केले जाते.
या चुका टाळा लक्ष्मी चा सदैव राहील आपल्या घरात……….
दिवाळीला लक्ष्मि पूजन करून सर्व जन लक्ष्मि देवी ला खुश करण्याचा प्रयत्न करत असतो व लक्ष्मि देवीची कृपा आपल्यावर राहावी याच प्रयत्नात असतो. पण दिवाळी ला लक्ष्मि पूजन करते वेळी या गोष्टी चे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे.या वेळेस दिवाळी ला लक्ष्मि पूजन करत असताना या गोष्टी कडे अवश्य लक्ष द्या.
- लक्ष्मि पूजन करते वेळी मोठ्या प्रतिमेचा उपयोग करू नये त्याच ठिकाणी छोट्या प्रतिमाच उपयोग करावा .
- वास्तूशास्त्रा नुसार लक्ष्मी पूजा नेहमी उत्तर पूर्व दिशा किंवा उत्तर दिशेत करावी.
- लक्ष्मी पूजन करते वेळी श्रीगणेशा ची हि पूजा करावी हे शुभ लाभ माने जाते.
- घराच्या मुख्य प्रवेशस दारावर रांगोळी काढावी.रंगोली काढते वेळी कृत्रिम रंगाच्या ऐवजी हळद ,आता याचा उपयोग रांगोळी काढताना करावा.
- पहिले अशोकाच्या किंवा आंब्याच्या झाडा च्या पानाची तोरण माळ बनवली जात होती आता सध्या झेंडू च्या फुलांचा वापर करून तोरण माल बनवून मुख्य प्रवेश द्वारस बांधली जाते.
- लक्ष्मी देवी चे पद चिन्ह असे राहावे कि ते बाहेरून आत येत यामुळे लक्ष्मि बाहेरून आहेत असे असावेत यामुळे लक्ष्मि बाहेरून आत येत आहे असे दिसते.
- घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य दारावर हळदी आणि कुन्कुवाचे स्वस्तिक अवश्य काढावे.
- दिवाळीत तुपाच्या दिव्याची पूजा करून “ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नम:” हे मंत्र उच्चार करा.
- दिवाळी चे दिवे जर चारही बाजूस असतील आणि चार च्या पटी मध्ये जस कि चार आठ बारा सोळा असे असतील तर ते खूपच शुभ मानले जाते.
पूजा रीतिरिवाजाने पूर्ण झाल्यावर देवतांच्या आगमनांच्या जल्लोषाला फटाके फोडून द्विगुणीत केले जाते.
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका.