DIWALI SNACKS FOR FAMILY

दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व दिले आहे.  “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.दिवाळी या शब्दाचा अर्थ “रोशनाईचा सन’ किंवा “दिपोत्सव” असा आहे. संस्क्रूत् मध्ये दिवाळी शब्दास “दिपावली” असा अर्थ मानला जातो. याचा अर्थ “दिव्यांची रांग” असा केला जातो.भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या चालीरीती प्रमाणे यास साजरा करतात त्यामुळे या सणाला प्रत्येकाच्या घरी आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. घरात आणि दुकानात फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवले जाते. आकाश कंदील घरासमोर लावल्या जातो. सुंदर रांगोळी काढल्या जाते. विविध रंगांनी ती सजवली जाते.दिवाळी सणाच्या दिवशी फटाके फोडले जातात त्याबरोबरच खमंग असा फराळ बनवला जातो. तुम्ही पण हे खालील वेगळे पदार्थ बनवून घरच्यांना व घरी दिवाळी सणानिमित्त आलेल्या पाहुण्या मंडळीना हे पदार्थ बनवून खुश करू शकता.           

 

या चुका टाळा लक्ष्मी चा सदैव राहील आपल्या घरात……….

चॉकलेट बर्फी

बर्फीला बर्फी किंवा बर्फी असेही म्हणतात. बर्फीमध्ये बरेच प्रकार आहेत.

साहित्य :

खवा – 2 कप,दूध – ¼ कप,दुधाची पावडर – 2 चमचे,साखर – ¼ कप,तूप – 2 चमचे,वेलची पूड – as चमचे,कोको पावडर – 1 चमचे,पिसा पिसा – 2 चमचे

चॉकलेट बर्फी बनवण्याची कृती :  :

नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करून घ्या.त्यात मावा घालून 5 मिनिटे परता. सतत ढवळत राहा.त्यात साखर आणि दूध घाला आणि मिक्स करावे. ढवळत रहा. नंतर दुध पावडर, वेलची पूड घाला आणि मिक्स करावे.आपण पाहू शकता की मावा घट्ट झाला आहे आणि पॅनच्या बाजुला चिकटत नाही.आता ते मिश्रणात प्लेट मध्ये काढून घ्या व त्यावर किसलेले प्लेटवर काढून खोयाचे मिश्रण पसरवा आणि मिश्रण थंड होऊ द्या. नंतर उर्वरित खोया मिश्रणात कोको पावडर घालून मिक्स करावे.गॅसवरून पॅन काढा आणि थोडासा थंड होऊ द्या. आता पांढरया खव्याच्या माथ्यावर हे कोको मिश्रण नंतर पसरवा आणि हळू करा. ते पूर्णपणे थंड होऊ द्या.

पायरी 9: पिस्ता वर पसरवून करून चॉकलेट बर्फीचे छोटे तुकडे करा.

आपल्या स्वादिष्ट चॉकलेट बर्फी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

(हि बर्फी गस कमी करून करावेत )

 

अंजली बाईंच्या या बोल्ड फोटो ने सोशल मीडिया वर घातला धुमाकूळ.. पाहा फोटो

नायलॉन पोहय़ांचा चिवडा

साहित्य :

अर्धा किलो नायलॉन पोहे, १ कप भाजून सोललेले दाणे, अर्धा कप खोबऱ्याचे अतिशय पातळ काप, १ कप डाळ, ६-७ हिरव्या
मिरच्या, कढीलिंबाची अर्धा कप पानं धुऊन, पुसून, चिरून, मीठ, पिठीसाखर, जिरेपूड, नेहमीची जास्त हिंग घातलेली फोडणी, थोडं साजूक तूप.

नायलॉन पोहय़ांचा चिवडा बनवण्याची कृती :

पूर्वतयारी करून ठेवा. हे पोहे मायक्रोवेव्हमध्ये भाजून घ्या. खोबरं, दाणे, डाळं तळून घ्या. तुपाची फोडणी बनवून त्यात मिरच्या, कढीलिंब परता. पोहे, डाळ, दाणे, खोबरं, जिरेपूड, मीठ, साखर इ. घालून चांगलं ढवळून घ्या. (गॅस बंद ठेवा) गार झाल्यावर डब्यात भरा.

 मुगाच्या पिठाचे लाडू:

साहित्य :

२ कप मुगाची डाळ स्वच्छ धुऊन, १०-१५ मिनिटे भिजवून, फडक्यावर वाळवून घ्या व मग भाजा, रवाळ दळून घ्या.

कृती :

साजूक तुपावर रवाळ पीठ भाजून घ्या. पीठ फार बारीक दळल्यास लाडू खाताना टाळ्याला चिकटतो, म्हणून ‘भुरी शक्कर’ घालून वळा. भुरी साखर अशी बनवा- दीड कप साखर व १ कप पाण्याचा पाक करत ठेवा. २ थेंब लिंबाचा रस व १ चमचा तूप घाला. पाक पक्का झाल्यावर गॅस बंद करा. ही साखर मिक्सरमध्ये दळून वापरा. या साखरेमुळे लाडू खमंग लागतो. मऊ केलेला गूळ घालूनही लाडू बनविता येतील. डाळीचं पीठ वरील पद्धतीने केल्यास लाडू पचायला हलका होतो. (लिंबाचा रस घातल्याने साखर स्वच्छ होईल.)
* पाक परातीत घालून जड भांडय़ाने घोटल्यासारखे केले तरी पांढरीशुभ्र साखर मिळेल.

 माहिती आवडल्यास share करायला विसरू नका ………………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *