सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीचे भावोजी म्हणून प्रसिध्द असलेले सर्वांचे लाडके आदेश बांदेकर यांनी सुचिञा सोबत प्रेमविवाह केला आहे, हे खूप कमी लोकांना माहिती असेल.
18 जानेवारी 1966 ला आदेश बांदेकर यांचा जन्म झाला. ते लहानपापासूनच अभिनय क्षेञात काम करीत होते. सुचिञा पण लहानपणापासूनच अभिनय करीत होत्या. त्या नववी वर्गात असताना “रथचक्र” नावाच्या मालिकेत काम करीत होत्या. त्या मालिकेत आदेश बांदेकर यांनी एका दिवसाचा अभिनय केला होता. शूटिंग दरम्यान आदेश यांनी सुचिञा यांना पहिल्यांदा पहिले व पाहताच प्रेमात पडले. ते मग सुचिञाचा पाठलाग करू लागले. त्यांनी सुचिञाची थेट शाळा गाठली. त्यावेळी सुचिञा यांनी सरळ सांगितले की “तू माझा पाठलाग करू नकोस, मी काही तुला होकार देणार नाही. तरीही आदेश यांनी पाठलाग करणे सोडले नाही.
वाचा : स्मिता पाटीलच्या मृत्यूचे कारण वाचून तुम्हालाही दुःख होईल
एके दिवशी आदेश यांनी सुचिञाला दादर येथील एका हॉटेल मध्ये बोलाविले. सुचिञा तयार झाल्या व भीतीपोटी त्यांनी आपल्या एका मैत्रिणीला सोबत घेतले. पण मनात इतकी भीती होती की त्या हॉटेल पर्यंत गेल्याच नाहीत. आदेशनी वाट पाहून चक्क सुचित्रचे घर गाठले. सुचिञा जेंव्हा घरी आली तेंव्हा आदेश मस्त सुचिञा यांच्या आईसोबत सोबत चहा पित बसले होते. सुचिञाच्या आईला बाहेर कामासाठी जायचे असल्याने त्या निघाल्या. त्यांच्यासोबत आदेश पण थोडे बाहेर गेले आणि परत ते वापस सूचिञाच्या घरी आले आणि तिला रागात म्हणाले. मला एकतर होकार दे, नाहीतर नकार दे. मी तुला आज महालक्ष्मी च्या मंदिरात घेऊन जाणार होतो. हे ऐकताच सुचिञा यांनी म्हटले, “कधी जायचं आपण महालक्ष्मीच्या मंदिरात.” हे ऐकुन आदेश बांदेकर खुश झाले. अशा प्रकारे आदेश यांनी डायरेक्ट घरी जाऊन सुचिञाला प्रपोज केले होते.
दोघांचे प्रेम सुरू झाले. आदेशला जॉब नसल्याने सुचिञा यांच्या घरच्यांकडून विरोध होता. घरच्यांच्या विरोधात जाऊन सुचिञा आणि आदेश बांदेकर यांनी 14 नोव्हेंबर 1990 रोजी बांद्रा कोर्टात जाऊन लग्न केले. त्यावेळी त्यांच्या लग्नाचा खर्च फक्त 50 रुपये झाला होता. आदेश सुचिञा यांच्या लग्नाला 29 वर्षे पूर्ण झाली. त्यांना सोहम नावाचा एक मुलगा पण आहे.
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका