Ajit Pawar latest News महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना काल घडली.महाविकासआघाडी सत्ता स्थापनेसाठी बैठका घेत असतानाच काल अचानक राष्ट्रपती इजावत हटवून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी युती केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. Ajit Pawar latest News त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे. दिवसभरातील सर्व घडामोडींनतर आज रात्री १० वाजता अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहे.
वर्षा बंगल्यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. Ajit Pawar latest News शिवसेना कॉंग्रेस णे दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टातील सुनावणीपासून इतर राजकीय घडामोडींबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजप नेते विनोद तावडे, भुपेंद्र यादव आणि गिरीश महाजन या बैठकीत उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजितदादा पवार काही तासांपूर्वीच ट्विटरवर सक्रीय झाले होते व . अजित पवार यांनी ट्विटरवर सक्रीय झाल्यापासून भरपूर ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये अजित पवारांनी भाजप सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे आभार मानले होते.
मात्र त्यानंतर काही मिनिटांत त्यांनी मी राष्ट्रवादीमध्ये आहे, आणि कायमच राष्ट्रवादीसोबत राहीन.Ajit Pawar latest News शरद पवार साहेबच आमचे नेते आहेत, असं ट्वीट केलं होतं. आमची भाजप-राष्ट्रवादी आघाडी पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात एक स्थिर सरकार देईल. ही आघाडी राज्य आणि लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करेल, अशी हमी अजित पवारांनी ट्विटद्वारे दिली.
There is absolutely no need to worry, all is well. However a little patience is required. Thank you very much for all your support.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
‘काळजी करण्याची गरज नाही, सर्व काही ठीक आहे. मात्र थोडा संयम आवश्यक आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल तुमचे आभार’ असंही अजित पवार म्हणाले होते.तर शरद पवार यांनी हे फेटाळून लावले आहे.याबरोबरच शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे सर्व आमदारांची फोडाफोड होऊ नये म्हणून त्यांना गुपचूप हॉटेल मध्ये ठेवण्यात आले आहे व सर्व वरिष्ठ नेते त्या सर्व आम्दांच्या साम्प्रकात आहेत व त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
माहिती share करायला विसरू नका…..