Bride भारत हा पारंपरिक रुढी परंरेनुसार चालणारा देश आहे. देशात आज पण पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपरेचे पालन केले जाते.Bride आजच्या युवा पिढीला या रुढी परंपरेचे ज्ञान नसते. आजची पिढी या सर्व गोष्टींना अंधश्रद्धा मानते. पण घरातील वृद्ध व्यक्तींमुळे या परंपरेला पुढे नेण्यात येते. त्यातीलच एक परंपरा म्हणजेच लग्न झालेल्या मुलींना Brideबुधवारी सासरी न पाठविणे.
शास्त्रानुसार चंद्राला बुध ग्रह आपला शत्रू मानतो. याउलट चंद्र मात्र बुध ग्रहाला आपला शत्रू मानत नाही. शास्त्रानुसार बुध ग्रहाला धनलाभा चे प्रतीक मानले जाते तर चंद्राला प्रवासाचे घटक मानले जाते. तुमचा बुध खराब असेल तर दुर्घटना होण्याची शक्यता असते. याव्यतिरिक्त मुलींना सासरी न पाठविण्या मागे आणखीन एक कथा आहे.
ही कथा खूप अगोदरची आहे. एका नगरात मधुसूदन नावाचा एक सावकार होता. त्याचे लग्न अतिशय देखणी आणि गुणवान मुलीसोबत झाले. तिचे नाव संगीता होते. माहेरी गेलेल्या पत्नीला मधुसूदनने आपल्या सासरच्यांना बुधवारी पाठवायला सांगितले. परंतु संगीताच्या आई वडिलांनी यासाठी नकार दिला. पण सासऱ्यांचा मान न ठेवता मधुसूदन ने बायकोला पाठवायला सांगितले. शेवटी मुलीला मधुसूदन सोबत त्यांनी बैलगाडीने पाठविलेच .
पती पत्नी येत असताना बैलगाडीचं चाक अचानक तुटून पडलं. दोघे पायी चालू लागले. चालता चालता काही वेळाने संगीताला तहान लागली. संगीताला एका झाडा खाली बसवून मधुसूदन पाणी आणण्यासाठी गेला. पाणी घेऊन आल्यास मधुसूदन एक गोष्ट पाहून हैराण झाला. संगीताच्या बाजूला एकदम हुबेहूब त्याच्याच सारखा दिसणारा एक माणूस बसला होता.
संगीताला खरा कोण हेच कळेनासे झाले. मधुसूदनने त्या व्यक्तीला तू माझ्या पत्नीजवळ का बसला आहेस, असे विचारले. तेंव्हा त्या व्यक्तीने म्हटले, ही माझी बायको आहे तुम्ही कोण आहात? हे ऐकताच मधुसूदन रागात आला आणि तो त्या व्यक्तीसोबत भांडण करू लागला. दोघाना राजाकडे नेण्यात आले. राजाने निर्णय दिला नाही त्यामुळे दोघांना ही कारागृहात डांबून ठेवण्यात आले. हे ऐकताच खरा मधुसूदनची घाबरून गेला. त्याचवेळी आकाशातून आवाज आला की, बुधवारच्या दिवशी तू जबरदस्तीने बायकोला आणलं आहेस, म्हणून बुध देवाचा हा तुझ्यावर झालेला प्रकोप आहे.
Aditi Budhathoki नवीन अभिनेत्री च्या बोल्ड लूक केले
हे ऐकताच मधुसूदनला आपण केलेल्या चुकीची जाणीव होते. तो नंतर अशी चूक कधीच करणार नसल्याचं सांगत बुध देवाची माफी मागितली. बुध देवाने त्याला माफ करून टाकले. नंतर तो नकली वाला मधुसूदन अचानक गायब झाला. सर्वजण हा बुध देवाचा चमत्कार बघून खूप आश्चर्यचकीत झाले. तेंव्हा पासून ही मुलींना याच कारणाने बुधवारी सासरी पाठविले जात नाही.
माहिती आवडली तर नक्की शेयर करा