तुम्ही वाचून नक्कीच आश्चर्यचकित झाला असाल. हो हे एकदम खरे आहे. आस्था वर्मा नामक एका 22 वर्षाच्या मुलीने आपल्या ट्विटर अकऊंटवरून एक पोस्ट अशी टाकली की काही वेळातच त्या पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे. ती म्हणजेच आस्था ने स्वतःच्या आई साठी जीवनसाथी हवा अशी टाकलेली पोस्ट होय.
Looking for a handsome 50 year old man for my mother! 🙂
Vegetarian, Non Drinker, Well Established. #Groomhunting pic.twitter.com/xNj0w8r8uq— Aastha Varma (@AasthaVarma) October 31, 2019
सोशल मीडियाच्या या युगात कधी कोणती गोष्ट वायरल होईल हे सांगता येत नाही. कधी कधी काही चांगल्या गोष्टी वायरल होतात तर कधी कधी वाईट पण गोष्टी वायरल होत असतात. पण आस्था नामक या मुलीच्या पोस्ट ने सध्या सोशल मीडिया वर गोंधळ घातला आहे.
Sindhutai sapkaal स्वतःच्या मुलीला माईंनी दुसर्यांना सांभाळायला का दिलं कारण …..
आस्था वर्मा एक लॉ ची विद्यार्थिनी असून 31 ऑक्टोबर ला रात्री 8.12 मिनिटाला ट्वीटरवर आपल्या आईसोबत ची एक फोटो शेयर केली. कॅप्शन मध्ये तिने असे लिहिले आहे की “माझ्या आई साठी 50 वर्षाचा एक सुंदर जीवनसाथी हवा, जो दारूची नशा करणारा नसावा, शुद्ध शाकाहारी असावा आणि आपल्या आयुष्यात स्थिर झालेला असावा.”
Aishwarya Rai Bacchan ऐश्वर्या च्या या काही खास गोष्टी
बघता बघता काही वेळातच ही पोस्ट इतकी वायरल झाली की लोक त्यावर प्रतिक्रिया देऊ लागले. कोणी या पोस्टला हसण्यावर घेतले तर खूप लोकांनी आस्था च्या या निर्णयाची वाहवाही केली. एकाने तर आपल्या वडिलाची फोटो कमेंट मध्ये टाकली. कोणी तरी हसण्यावर घेत चक्क राहुल गांधी ची फोटो कमेंट केली.
कोणालाही स्वतःचा जीवनसाथी हवाच असतो. आस्था लग्न होऊन सासरी गेल्यास तिच्या आईचा सांभाळ कोण करणार, यासाठी तिने हा निर्णय घेतला असावा. कारण काहीही असो पण या पोस्ट मुळे सोशल मीडिया वर मात्र खूप चर्चा सुरू झाल्या आहेत.
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका