“माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेचा मुख्य अभिनेता(विलन) गुरुनाथ (Gurunath) म्हणजेच अभिजित खांडकेकर याची खऱ्या आयुष्यातील पत्नी खूपच सुंदर दिसते. “माझ्या नवऱ्याची बायको” मध्ये गुरु मालिकेतील आपल्या बायकोला म्हणजेच राधिकाला फसवून गर्लफ्रेंड शण्यासोबत संबंध जोडलेले दाखविण्यात आले आहे.

मालिकेत अभिजित (Gurunath) जरी विलन असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र तो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो.”सुखदा खांडकेकर” असे अभिजितच्या खऱ्या पत्नीचे नाव आहे. त्यांची प्रेम कहाणी पण खूप सुंदर आहे. “माझिया प्रियाला प्रीत कळेना” या मालिके दरम्यान सुखदाने अभिजित(Gurunath) ला फेसबुक वर मेसेज पाठविला होता.
“अंकुर वाढवे”ची पत्नी दिसते खूपच सुंदर.. पाहा फोटोज्

अभिजीतने त्या मेसेज ला रिप्लाय दिला आणि तेंव्हा पासूनच त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. काही दिवसानंतर अभिजित ने सुखदाला स्वतःहुन लग्नाची विचारणा केली आणि 1 फेब्रुवारी 2013 ला दोघे विवाहबंधनात अडकले.


सुखदाने पण अभिनय क्षेत्रात काम केले आहे आणि आत्ताही ती करते. तिने कथ्थक नृत्यात पण आपले कौशल्य दाखविले आहे. संजय लीला भन्साळीचा “बाजीराव मस्तानी” या गाजलेल्या हिंदी चित्रपटात बाजीरावच्या बहिणीचे काम केले होते. अभिजित पेक्षा सुखदाच सोशल मीडियावर खूप जास्त अक्टिव्ह असते.मालिकेत अभिजीतला बायकोप्रती वाईट दाखविले असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र तो आदर्श पतीच आहे.

माहिती आवडली तर नक्की शेयर करा.