Heart touching Story

Heart touching Story सात जन्म सोबत राहण्याचे वचन घेऊन झालेले 2 जीवांचे मिलन म्हणजेच लग्न होय. लग्नानंतर नवरा बायकोच्या नात्यात समजूतदारपणा असला तरच नाते छान टिकून राहते. समजूतदारपणा नसेल तर नाते टिकायला वेळ लागत नाही. Heart touching Story एक गोष्ट वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

aa
सोहम नावाच्या मुलाचे 3 महिन्यापूर्वी रोहिणी सोबत लग्न झाले होते. एके दिवशी रोहिणीची अंगठी घरातच हरवली. रोहिणी काही न विचार करता आपल्या सासुवर आरोप करू लागली. अंगठी तेबलवरच ठेवली होती, सासूनेच घेतली असणार, त्यांच्याशिवाय रूम मध्ये कोणी नव्हते आहे. सोहम ने तीला आपल्या मर्यादेत राहण्यास सांगितले. पण रोहिणी शांत होण्याचे नावच घेत नव्हती. ती आणखीन जास्त रागात येऊन तेच म्हणू लागली”मी तर अंगठी इथे टेबलवर ठेवली होती आणि रूममध्ये तुमच्या आई व्यक्तिरिक्त कोण पण आले नाही. त्यामुळे अंगठी तुमच्या आईनेच घेतली आहे.

Heart touching Story

सोहमला पण शेवटी राग अनावर झाला व त्याने रोहिणीच्या जोरदार कानाखाली वाजवली. तीन महिन्या पूर्वीच लग्न झाले असल्यामुळे रोहिनीला हे सहन झाले नाही. तिने आपली बॅग आवडली आणि घर सोडून जाऊ लागली. जाताना पतीला तिने एक प्रश्न विचारला, “तुमच्या आईवर तुम्हाला इतका विश्वास कसा असू शकतो??तेव्हा सोहम ने तिला असे उत्तर दिले, ते उत्तर ऐकून दरवाजा मागे उभी असलेल्या आईचे मन भरून आले. त्याने पत्नीला सांगितले. “जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे वडिलांचे देहांत झाले.

Heart touching Story

माझी आई आजूबाजूला झाड़ू मारुन पैसे जमवायची आणि त्यात केवळ एकाच वेळेचे जेवण बनायचे. एका ताटात ती मला भाकर भाजी वाढायची आणि स्वतःलारिकाम्या डब्यात माझे जेवण आहे असे खोटे सांगायची. मला ते कळायचे त्यामुळे मी पण नेहमी अर्धीच भाकर
खायचो आणि म्हणायचो, “माझं पोट भरले आहे. मला नाही खायचं” आईने माझी तीच अर्धी भाकर खातच मला लहानाचे मोठे केले आहे. आज मी फक्त तिच्या मुळे दोन भाकरी कमवित आहे.

मुलींना बुधवारी सासरी का पाठवित नाहीत, यामागचे मोठे कारण वाचा…

Heart touching Story

मी हे सगळं कसे विसरु की ज्या आईने एकेकाळी स्वतःच्या भुकेलामारले, त्याच आईला या स्तिथिला अंगठी चोरण्याची हाव असेल. याचा मी विचार पण करू शकत नाही.तू फक्त 3 महिन्यापासून माझ्या सोबत राहते. मी तर आईला 25 वर्षापासून ओळखतो. हे सगळं ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आले.सोहमची आई समोर आली आणि रडू लागली. रोहिणी ने बॅग आत मध्ये नेऊन ठेवली. शेवटी अंगठी कपाट मध्ये सापडली, त्यामुळे रोहिणी ला तिच्या चुकीची जाणीव झाली.

आवडल्यास share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *