Invest in ppf and become millionaire. बचत आणि गुंतवणुकीचे काही स्मार्ट पर्याय वापरून तुम्ही तुमचे कोट्यधीश बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. आम्ही त्यासाठी तुम्हाला मदत करणार असून कोट्यधीश होण्याचा एक खास मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पोस्ट ऑफिसमधल्या (Post Office) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) च्या माध्यमातून तुम्ही कोट्यधीश बनू शकता फक्त त्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागणार आहे

वाचा : FD नाही तर इथे गुंतवणूक केल्यास मिळतो जास्त फायदा

PPF मध्ये गुंतवणूक करणं हे सर्वात सुरक्षीत आणि कमी धोक्याचं आहे. कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही त्यासाठी अकाउंट उघडू शकता. सध्या पोस्ट ऑफिस त्यावर तुम्हाला 7.9 टक्के एवढं व्याज देतं. दर तीन महिन्यांनी या व्याजाचा आढावा घेतला जातो. या गुंतवणुकीची हमी सरकार देत असते.

अशी करावी लागेल गुंतवणूक

सध्या असलेल्या 7.9 टक्के व्याजाच्या आधारावर पुढची 25 वर्ष गुंतवणूक केली तर त्यातून तुम्हाला 1 कोटी 2 लाख रुपये मिळू शकतात. त्यासाठी PPF च्या खात्यात वर्षाला 1.5 लाखपर्यंत गुंतवणूक करावी लागेल.

यातून मिळणारं उत्पन्न आणि गुंतवणूक ही करमुक्त असते. काही वर्षांमधल्या व्याजाची सरासरी काढली तर तर यावर 8 टक्के व्याज मिळालं आहे. हे PPF अकाऊंट कुठल्याही सरकारी आणि खासगी बँकेत काढता येतं.

PPF खातं उघडल्यानंतर पाच वर्षांपर्यंत त्यावर लोन मिळण्याची सुविधाही त्यावर मिळू शकते. त्यासाठी अर्ज केल्यानंतर काही कागदपत्र द्यावी लागतात ती दिल्यानंतर लोनही मिळू शकते.

माहिती आवडल्यास share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *