jcb bull news indapur

jcb bull news indapur बैल हा शेतकर्यांसाठी आधार असतो. दिवसभर हा बैल शेतकऱ्याच्यासोबत शेतात कबाड कष्ट करत असतो. प्रत्येक शेतकरी बैलांचा आपल्या मुलाबाळांप्रमाणे संभाळ करतात. jcb bull news indapur बैलाला पोळ्याच्या सणाला दैवत माणून बैलपोळ्याला हार-फुलांनी सजवले जाते. वाजत-गाजत मोठ्या उत्साहात मिरवणुकही काढत जाते. बैल आणि शेतकऱ्यांचे नाते अतूट असते,परंतु काही दिवसापासून JCB ने  एका बैलाला मारण्याचा video व्हायरल झाला होता.त्यामुळे JCB चालवणाऱ्या व्यक्ती बद्दल सर्वजन राग व्यक्त करत होते.

jcb bull news indapur

जेसीबीने बैलाची हत्या केल्याचा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील इंदापूरचा असल्याची माहिती आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारा बैल हा पिसाळलेला आहे. परिसरातील नागरिकांमध्ये त्य़ाच्यामुळे भितीचे वातावरण पसरले होते. या बैलामुळे सर्व नागरिक व लहान मुले यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.त्यामुळे गावकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने बैलाला काही क्षणातच ठार केले. यावेळी कुणीही या बैलाबाबत सहानुभूती दर्शवली नाही, उलट गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

गायिका गीता माळी यांच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल पहा

याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील पोंदवडी येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिगवण पोलिसांनी  दोघांवर प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 27 ऑक्टोबरला या दोघांनी जेसीबीच्या सहाय्याने पिसाळलेल्या बैलाला निर्घृणपणे ठार केले.

हा video पाहून मनुष्याच्या क्रूरपणा आणखी एकदा समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *