Jenny News सध्या झी मराठीवर चालू असलेली माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील कलाकार जेनी सोबत घडलेला एक किस्सा सांगणार आहोत.Jenny News जे ऐकून तुम्हालाही जेनीचा अभिमान वाटेल. जेनीने खरे नाव शर्मिला राजाराम शिंदे आहे. शर्मिलाने तिच्या डोळ्यासमोर घडलेली एक घटना सोशल मीडिया वर शेयर केली आहे.
ही घटना 28 मे 2018 ची आहे. शर्मिला त्या दिवशी दुपारी MH-8 मुंबई – अहमदाबाद हायवेवरून नायगावच्या दिशेने शूटिंग साठी जात होती. अचानक रोडवरील सर्व गाड्यांचा वेग कमी होवू लागला. नंतर कळाले की रोडच्या दुसऱ्या बाजूला अपघात झाला आहे.Jenny News शर्मिलाने तिची गाडी कशी बशी रोड साईड ला नेली व ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उडी मारून गेली. तिथे असे कळाले एका अॅक्टिवा वरून जाणाऱ्या व्यक्तीला कोणी तरी उडवून गेले आहे. तो माणूस डोक्याला मार लागला असल्याने रक्तबंबाळ होवून रोडवर तसाच बेशुद्ध पडला होता.
सर्व लोक फक्त बघत होते. त्यात ट्रॅफिक पोलीस पण होते. तितक्यात शर्मिलाने त्या माणसाचे डोके मांडीवर घेतले आणि दुसऱ्यांना एखादा कपडा किंवा रुमाल देण्याची विनंती केली. पण कोणी द्यायला तयार नव्हते. एका सरदारजी ने आपल्या डोक्याची पगडी काढून दिली व शर्मिलाने त्या व्यक्तीच्या डोक्याला बांधली. अंबुलन्स ला कॉल पण लागत नव्हता. तितक्यात पोलिसाची गाडी आली. काहींनी त्या व्यक्तीला कसेबसे गाडी मध्ये बसविले. पोलीसही त्याला उपचाराला नेण्याची घाई करण्या एेवजी अपघात कसा झाला ते विचारण्यात वेळ घालवू लागले.
तो व्यक्ती आपल्या आयुष्यातील शेवटचे एक एक क्षण मोजत असताना लोकांची व पोलिसाची दिरंगाई पाहून शर्मीला मनातून खचून गेली. नंतर त्या व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. शर्मिलाला त्या सरदारजी ने पाण्याची बॉटल दिली व अंगावरचे रक्त साफ करण्यास सांगितले. सरदारजी ने शर्मिला विचारले, “आप डॉक्टर हो क्या?”. शर्मिलाने त्याला सांगितले “नाही मी अॅक्टर आहे”. नंतर शर्मिलाने गाडी बाजूला लावून खूप रडली. कोणीही मदतीला धावून न आलेले आणि अंबुलन्स ला वेळेवर संपर्क न होणे, याचेच तिला दुःख वाटत होते. तो माणूस वाचला की नाही याचे तिला पुढील काही दिवस दुःख वाटू लागले.
अभिनेता शरद केळकर ची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री..
गेल्या आठवड्यात एका व्यक्तीने तिला मेसेज केला आणि त्या अपघाताची आठवण करून दिली. त्यांनी मेसेज मध्ये असे सांगितले की अपघात झालेला तो व्यक्ती आता सुरक्षित आहे. शर्मिला डॉक्टर नसली तरी ती अशा वेळी नेहमी मदतीला धावत असते. तिने केलेली ही मदत पाहून खरेच खूप कौतुकास्पद आहे.
माहिती आवडली तर नक्की शेयर करा