Madan Real Wife झी मराठी वर संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास चालू असलेली मालिका लग्नाची वाइफ वेडींगची बायको सध्या प्रेक्षकांना खूप आवडू लागली आहे. Madan Real Wife तुझ्यात जीव रंगला ही प्रसिद्ध मालिका ज्या वेळेत चालायची त्याच वेळेत ही नवीन मालिका सुरू आहे.

या मालिकेत मदन नावाचे पात्र आपली पत्नी काजल ला फसवित विदेशी प्रेयसी काजल ला आपल्या घरी आणून ठेवतो. पत्नी काजल ला कळू नये की ती मारिया ही त्याची गर्लफ्रेंड आहे यासाठी चालू असलेला घालमेल या मालिकेतून दाखविण्यात येत आहे. या मालिकेत मदनची भूमिका विजय आंदळकर, मदनच्या पत्नीची भूमिका काजल झंकार तर मारिया ची भूमिका लियाना आनंद हिने केली आहे.

मालिकेचा हिरो विजय आळंदकर हा पेशाने वकील आहे. त्याला अगोदर पासूनच अभिनयाची आवड असल्याने तो अभिनय क्षेत्रात आला. विजय ने या अगोदर बाजीराव मस्तानी, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, शिमगा अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत शंभूराजे यांनी बहीण महाराणी रानुबाई यांचे पती कृष्णाजी जाधव यांची भूमिका केली होती.
मराठीतील 5 सर्वात जास्त फेमस मालिका.. “तुला पाहते रे”ला भेटले हे स्थान
विजय आंदळकर याची खऱ्या आयुष्यातील बायको खूपच सुंदर दिसते. त्याच्या बायकोचे नाव पूजा पुरंदरे असून ती पण एक अभिनेत्री आहे. दोघांचे लग्न नोव्हेंबर 2017 मध्ये झाले होते. पूजा ने आपल्या अभिनयाचा प्रभाव सुंदर माझे घर, देवयानी या मालिकांमधून दाखविला आहे. या दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.


माहिती आवडली तर नक्की शेयर करा.