maharashtra politics latest news

Maharashtra politics latest news रात्त्रीतून एक खळबळजनक घटना घडली आहे .सत्तासंघर्ष सोडवण्यासाठी महाविकासआघाडीकडून सातत्यानं बैठकांचा सिलसिला सुरू होता. आज चर्चा अंतिम टप्प्यात येणार असल्याची चर्चाही होती. Maharashtra politics latest newsअखेरच्या टप्प्यात सगळं ठरत असताना मात्र अचानक राजकीय भूकंप आला आणि थेट राजभवनात मुख्ममंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला.भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची युती होऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. रात्रीतून राष्ट्रपती राजवट राजवट संपवून रात्रीतून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्चा दिया आहेत.

महिनाभर नुसतं चर्चेचं गुऱ्हार चालू होतं मात्र त्यामधून कोणताही तोडगा निघत नव्हता. त्यामुळे स्थिर सरकार स्थापन कसं होणार हा प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जो माझ्यावर विश्वास दाखवून मला जी जबाबदारी दिली आहे ती निश्चितपणे चांगल्यापद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

अचानक आलेल्या राजकीय भूकंपामुळे मात्र अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. शिवसेना आणि काँग्रेसला डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केली का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली का? अजित पवार महाविकास आघाडीत होत असलेल्या चर्चांबाबत नाराज होते का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.नेमका अजित पवार गटाचा भाजपा ला पाठींबा आहे कि संपूर्ण राष्ट्रवादी चा हे अद्याप कळालेले नाही. सुप्रिया सुळे यांना देखील केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे .आता  संपूर्ण लक्ष हे शरद पवार काय भूमिका घेतात यावर लक्ष केंदित केले आहे.हा शिव्शेनेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

माहिती share करायला विसरू नका …

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *