Manushi Chillar मानुषी चिल्लर हि २०१७ मध्ये मिस वर्ल्ड हा खिताब मिळविला होता व यामुळेच तिच्यासाठी bollywood चे दरवाजे हि उघडले गेले आहेत. मानुषी चिल्लर Manushi Chillar हि अक्षय कुमार सोबत पृथ्वीराज या फिल्म मध्ये काम करणार आहे . पदार्पणच्या सिनेमात अक्षय कुमारसोबत काम करायला मिळणं ही तिच्यासाठी खूप मोठी संधी आहे. याविषयी बोलताना मानुषी म्हणाली, माझ्यासाठी ही खूपच सन्मानाची गोष्ट आहे की यशराज फिल्मनं मला त्याच्या सिनेमाची हिरोइन म्हणून निवडलं. या प्रवासात मला अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत.अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ हा ऐतिहासिक सिनेमा पुढच्या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
यशराज फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या पृथ्वीराज सिनेमामध्ये अभिनेता अक्षय कुमार चौहान वंशाचे राजा पृथ्वीराज यांची भूमिका साकारत आहे. तर मानुषी या सिनेमात राजा पृथ्वीराज यांची पत्नी संयोगिता यांची भूमिका साकरणार आहे. मानुषीच्या निवडीबद्दल बोलताना निर्माते सांगतात, या सिनेमासाठी आम्हाला एका नव्या आणि सुंदर चेहऱ्याची गरज होती. मानुषीनं यासाठी अनेकदा ऑडिशन दिल्या आणि प्रत्येक वेळी तिनं बेस्ट परफॉर्मन्स दिला. यानंतर ती आठवड्यातले 6 दिवस रोज रिहर्सल करत आहे तसेच तिला यशराज फिल्मकडून 9 महिन्यांचं ट्रेनिंगही देण्यात आलं आहे.
अक्षय कुमारने ट्विटरवर पृथ्वीराज टीमचा एक हवन करत असलेला व्हिडिओ सामायिक केला होता. हा चित्रपट एक वायआरएफ निर्मिती असून, क्लिपमध्ये अक्षय कुमार, मानुषी छिल्लर आणि दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्यासह राणी मुखर्जीदेखील या क्लिपमध्ये दिसली आहेत.
Aditi Budhathoki नवीन अभिनेत्री च्या बोल्ड लूक केले Clean bold
Here's to auspicious beginnings 🙏 Stepping into the world of #Prithviraj. In theatres #Diwali2020!
Need your love and best wishes as always. @ManushiChhillar #DrChandraprakashDwivedi @yrf pic.twitter.com/w3KQh4NhPe— Akshay Kumar (@akshaykumar) November 15, 2019
अक्षय कुमार सध्या हाऊसफुल 4 प्रदर्शित झाला आहे व त्या चित्रपटाने खूपच गल्ला जमविला आहे.अक्षय कुमार ची प्रत्येक फिल्म सध्या हिट किंवा सुपर हिट होत आहे त्यामुळे तो त्याच्या कामामध्ये पूर्ण पणे व्यस्त आहे.अभिनेता अक्षय कुमार मागच्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. यंदाच्य वर्षात 4 सिनेमा रिलीज झाले. पण याशिवाय त्याचं पुढच्या वर्षीचं शेड्यूल सुद्धा बीझी झालं आहे. त्याच्या आगामी सिनेमांमध्ये लक्ष्मी बॉम्ब, सूर्यवंशी, बेलबॉटम यांच्यासह एका पृथ्वीराज या ऐतिहासिक सिनेमाचाही समावेश आहे.
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका