most famous marathi serials. गेल्या काही वर्षांपासून मराठी मालिकेने अत्यंत भरारी घेतलेली दिसून येत आहे. मराठी मालिकेचा वाढलेला दर्जा आणि आणि प्रेक्षकांचा मराठी मालिका पाहण्याकडे वाढलेला कल यामुळेच मराठी मलिकांना सोनेरी दिवस आले आहेत असे म्हणता येईल. आज आपण मराठी आजपर्यंतच्या सगळ्यात प्रसिद्ध मालिका पाहणार आहोत.
5. दिल दोस्ती दुनियादारी : संजय जाधव यांनी युवा पिढीसाठी बनवलेली ही मालिका खूपच गाजली. काही मुले व मुली एकत्र कशी राहतात, याचे चित्रण या मालिकेतून करण्यात आले होते. अमेय वाघ, सखी गोखले, सुर्वात जोशी, पूजा ठोंबरे असे अनेक कलाकार या मालिकेमुळे उदयास आले.
Subodh Bhave latest “तुला पाहते रे” नंतर सुबोध भावे यांचे टिव्हीवर पुनरागमन..
4. एका लग्नाची दुसरी गोष्ट : स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या दिग्गज कलाकारांनी नवरा बायकोची अभिनय केलेल्या या मालिकेने प्रेक्षकांची खूप मने जिंकली. सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शन केलेली ही मालिका खूप काळ चालली.
3. उंच माझा झोका : महिलांसाठी लढा लढणाऱ्या रमाबाई रानडे यांच्यावर आधारित ही मालिका बनविण्यात आली. विरेन प्रधान यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते, तर या मालिकेतून स्पृहा जोशी हिने रमाबाईची भूमिका उत्तमरित्या निभावली होती. तसेच मालिकेत शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, शैलेश दातार हे देखील होते.
2. वादळवाट : 2002-2003 च्या दरम्यान आलेली ही मालिका सर्वच वयो गटातील प्रेक्षकांना अत्यंत आकर्षित केली. त्या काळातील मालिकेला आज पण लोक स्मरण करतात. सुबोध भावे, आदिती शारंगधर, मेघना वैद्य, शरद पोंक्षे अशा अनेक दिग्गज कलाकारांनी मालिकेला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले आणि देवकी पंडित यांनी गायलेले ते शीर्षक गीत आज पण कानात घुमत असते.
1. तुला पाहते रे : टीआरपी चे सर्वच उच्चांक मोडीत नवे रेकॉर्ड स्थापित करणाऱ्या या मालिकेने अल्पावधीच प्रेक्षकांची मने जिंकली. सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेला कमी वेळातच प्रेक्षकांनी आपलेसे केले. गिरीश मोहिते आणि चंद्रकांत गायकवाड यांनी दिगदर्शित केलेल्या या मालिकेने अल्पावधीतच निरोप घेतला असला तरी या मालिकेने फेमस मालिकेच्या लिस्ट मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
माहिती आवडली तर नक्की शेयर करा..