“तुझ्यात जीव रंगला” मालिकेत खलनायिकेची भूमिका करणारी अभिनेत्री धनश्री काढगावकर Nandita हिने आपल्या अभिनयाची अत्यंत उत्तमरित्या छाप पाडली. ती मालिकेत जरी खलनायिका असली तरी तिचा अभिनय हा प्रेक्षकांना खूपच आवडला. मालिकेत नंदिता Nandita गायकवाड या पात्राला तिने छान न्याय दिला.
धनश्री काढगावकर हिने तुझ्यात जीव रंगला मालिकेत येण्याअगोदर सोनी वाहिनीवरील क्राईम पेट्रोल या शो मध्ये पण तिने खूप सारे एपिसोड्स केले आहे. त्यामध्ये धोकेबाज, राख, दासी हे काही गाजलेले एपिसोड्स चा समावेश आहे. या काही एपिसोड्स मध्ये तिने महिलांवरील अत्याचााविरोधातील काही पात्र साकारले आहेत.
वाईट बातमी! ही अभिनेत्री तुझ्यात जीव रंगला मालिकेतून कायमची बाहेर जाणार
6 एप्रिल 1988 ला पुणे येथे धनश्रीचा जन्म झाला. पुण्यातच ती लहानाची मोठी झाली. तिने गरवारे कॉलेज मध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि आयएमसीसी कॉलेज मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. गंध फुलांचा या मराठी मालिकेत तिने महिमा नावाचे पात्र उत्तमरित्या साकारले होते.
धनश्रीचा अभिनय पाहता ती एक अनुभवी आणि कलाक्षेत्रात रुजलेली अभिनेत्री वाटते. तिची देहबोली आणि आवाजातील धमक तिच्या अभिनयाला आणखीन उंचीवर नेऊन ठेवते. मालिकेत राणाला मारायचा प्रयत्न केल्यामुळे आणि सासऱ्याना डांबून ठेवल्यामुळे तिला न्यायालयाने शिक्षा सुनावली व यामुळेच तिचे मालिकेतून निर्गमन झाले. तिच्या मालिकेतील एक्झिट मुळे मालिकेच्या फॅन्स मध्ये नाराजी दिसत आहे. पण ती लवकरच “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेत परत दिसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका