Navneet Rana Kaur latest news आज पासून हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून पहिल्याच दिवशी आरोप प्रत्यारोप सुरू झाले.शिवसेनेच्या 2-3 खासदारांनी आज शेतकऱ्यांबाबत मुद्दे मांडले यावर अमरावतीच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत कौर राणा Navneet Rana Kaur latest news यांनी लोकसभेत शिवसेनेवर हल्लाबोल अमरावतीच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवनीत कौर राणा Navneet Rana Kaur latest news यांनी लोकसभेतील निवेदनादरम्यान, महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी शिवसेनाच जबाबदार असल्याचा घणाघात केला.
Dr. Prakash Amte यांना त्यांच्या कार्यासाठी मिळणार आणखी एक पुरस्कार
“शिवसेनेने स्वत:चा स्वार्थ, स्वत:च्या घराचा फायदा पाहिला. शेतकऱ्यांसाठी मदतीची भावना जर माझ्या मनात असेल, तर मी स्वत:चं घरही पेटवू शकते आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारला पाठिंबा देऊ शकते”, असं अमरावतीच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
मात्र महाराष्ट्रातील जनता त्यांना प्रश्न विचारु इच्छिते की सभागृहात तुम्ही शेतकऱ्यांबाबत बोलता, मात्र तुम्हाला युती म्हणून बहुमत दिलं असूनही तुम्ही आपल्या स्वार्थासाठी, लालसेसाठी सरकार स्थापन करु शकला नाहीत. जर शेतकऱ्यांसाठी इतकं प्रेम, इतकी सहानुभूती होती तर शिवसेनेने महाराष्ट्रात आधी सरकार स्थापन करायला हवं होतं. महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या सर्वामागे ज्या कोणाचा सर्वात मोठा हात आहे, तो म्हणजे शिवसेनावाल्यांचा आहे”, असा हल्लाबोल नवनीत कौर राणा यांनी केला.
आज प्रत्येक तालुक्यात सर्व पीकाचं नुकसान झालं आहे. आज आमच्या राज्याला कोणीही मायबाप नाही. माझी केंद्राला विनंती आहे की आमच्या राज्याचं मायबाप आता केंद्र आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 50 हजार कोटी रुपयांची मदत करावी, जेणेकरुन शेतकऱ्यांचं घर चालू शकेल” अशी मागणी नवनीत राणा यांनी केली.
महिती आवडल्यास share करायला विसरू नका …