post office recruitment 2019 देशातील बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील पोस्ट खात्यात post office recruitment 2019 (डाक सेवा) ५ हजार जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरुणांना ही नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. या संबंधीची अधिकची माहिती indiapost.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून या भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.
भरती प्रक्रियेचे ठिकाण व जागांची संख्या :
|
आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या राज्यात ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विविध खात्यात ही भरती केली जाणार आहे. आंध्र प्रदेशात २ हजार ७०७, छत्तीसगड मध्ये १ हजार ७९९ तर तेलंगाणात ९७० जागांची भरती केली जाणार आहे.
|
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
|
सर्व पात्र उमेदवार १४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत या पदासाठी अर्ज करू शकतात.
अर्जासंबंधी तसेच पदासंबंधी सविस्तर माहिती पोस्ट खात्याच्या अधिकृत appost.in/gdsonline या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
|
वेतन :
|
पात्र ठरल्यानंतर उमेदवाराला कमीत कमी १० हजार रुपये तर जास्तीत जास्त १४ हजार ५०० रुपये पगार मिळणार आहे.
|
पदाचे नाव:
|
या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भारतीय पोस्ट सेवा विभागातील ब्रांच पोस्ट मास्तर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर आणि पोस्ट सेवक पदांची भरती केली जाणार आहे. |
वय | १८ वर्ष पूर्ण करणारा किंवा जास्तीत जास्त ४० वर्ष पूर्ण केलेला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे.
|
अर्ज करण्यासाठी लिंक | http://www.appost.in/gdsonline |
या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयात तो उत्तीर्ण असल्यास उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. तसेच पहिल्या प्रयत्नात त्याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असल्याचेही जाहिरातीत म्हटले आहे. पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या दहावीतील गुणांच्या आधारावर यादी तयार केली जाणार असल्याचेही यात म्हटले आहे. इच्छूक उमेदवार पोस्ट खात्याच्या अधिकृत वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.देशात मंदीची झळ सुरु बेरोजगार दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी हि एक सुवर्ण संधी होऊ शकते.तरी बेरोजगार तरुणांसाठी एक चांगली संधी आहे.
ई सिगारट म्हणजे आहे तरी काय?
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका …..