President's rule in maharashtra

President’s rule गेल्या 15 दिवसापासून घडत असलेल्या नाट्यमय घडामोडीचा अखेर निकाल लागला असे म्हणता येईल. भारतीय जनता पक्षाला वेठीत धरू पाहणाऱ्या शिवसेना पक्षाला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी स्पष्ट पाठिंबा दिला नसल्याने शिवसेना सत्ता स्थापन करण्यापासून वंचित राहणार असेच दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट President’s rule लाग करण्यात येणार आहे असे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रपती राजवट President’s rule नेमके आहे तरी काय हे जाणून घेऊयात आपण.

President's rule in maharashtra

जेंव्हा एखाद्या राज्यात निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी संपूर्ण बहुमत मिळाले नसेल आणि कोणताही पक्ष सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असेल त्यावेळी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते. राष्ट्रपती राजवट (President’s rule) ही भारताच्या संविधानामधील 352, 356, 360 या कलमानुसार नुसार लागू केली जाते. यातील 356 या कलमानुसार एखाद्या राज्यात सरकार जर कमी मतात आले असेल अथवा राज्याची सत्ता घेण्यास असमर्थ ठरल्यास ते सरकार रद्द करून त्या राज्याचा सर्व कारोभार थेट केंद्र सरकारकडे दिला जात असतो. राष्ट्रपती राजवट चालू असताना ज्या त्या राज्याचा जो कोणी राज्यपाल असेल त्यांना महत्वाचे घटनात्मक अधिकार असतात.

 Rajyapal President's rule in maharashtra

 

आत्तापर्यंत भारतात 126 वेळेस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. इशान्य भागात असलेले मणिपूर या राज्यात आजपर्यंत सर्वात जास्त वेळा म्हणजेच १० वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे तर फक्त दोन राज्यामध्ये आजपर्यंत एकदाही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली नाही. ते 2 राज्य म्हणजेच छत्तीसगड आणि तेलंगणा हे होय. मागील काळात जम्मू आणि काश्मीर या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती.

President's rule in maharashtra

आता महाराष्ट्रात पण तीच परिस्थिती होत असल्याचे दिसून येत आहे. तिढा सुटणार की राष्ट्रपती राजवट लागू होईल याकडे पाहणे महत्वाचे ठरेल.

ई सिगारट म्हणजे आहे तरी काय?

President's rule in maharashtra

 

माहिती आवडल्यास share करायला विसरू नका ……………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *