Radhika माझ्या नवऱ्याची बायको मालिकेची मुख्य अभिनेत्री राधिकाच्या Radhika खऱ्या आयुष्याबद्दल आणि खऱ्या जोडीदारा बद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. अनिता दाते-केळकर हे राधिका Radhika चे खरे नाव आहे. अनिता दाते चे मूळ गाव नाशिक आहे. नाशिक या शहरातच तीने आपले बालपण घालविले व तिथेच लहानाची मोठी झाली. अनिताने महाविद्यालयीन शिक्षण नाशिक शहरातच पूर्ण केले. अनिताची Radhika लहानपणापासूनच अभिनयाची खूप ओढ होती. त्यामुळे बालपणापासूनच तीने अनेक छोट्या छोट्या नाटकामध्ये काम केले होते.

अनिताची हीच अभिनयाची आवड तिला नाशिकमधून पुण्याला घेऊन गेली. पुण्यात एका नाट्य कलाकेंद्रात तिने अभिनयाचे धडे घेटले. त्याच नाट्य केंद्रात तिची भेट “चिन्मय केळकर” यांच्याशी झाली. चिन्मयला पण अभिनय खूप आवडत असे. त्याने पण त्यावेळी अनेक नाटकात काम केलं होते.

काही वर्षांनंतर “सिगारेट” या नाटकात अनिता आणि चिन्मय या दोघांनी सोबत काम केलं होतं. त्याच नाटकाच्या तालीमसाठी अनिता ने खूप मेहनत घेतली होती. ती रोज नाशिकहून पुण्याला येत असे. तिच्या याच अभिनयाप्रति असलेल्या प्रेमाला पाहून चिन्मय तिच्या प्रेमात पडला आणि तिला आपलं प्रेम व्यक्त केले. पण चिन्मय ने असेही एक अट घातली होती की आपण लग्नाची घाई करायची नाही. दीड वर्षे सोबत राहिल्यानंतर शेवटी दोघांनी लग्नाची गाठ बांधली. दोघांमध्ये आजही प्रेमाचे नाते खूप घट्ट आहे, असे अनिता म्हणजेच राधिका वेळोवेळी सांगत असते.
अंजली बाईंच्या या बोल्ड फोटो ने सोशल मीडिया वर घातला धुमाकूळ.. पाहा फोटो
माहिती आवडली तर नक्की शेयर करा