सर्वोच्च न्यायालयाने कितीही कायदा कडक केला भारतात तरी गुन्हे होतच असतात. रोज कोणते ना कोणते गुन्हे देशात होतच असतात. कोणत्याही गुन्ह्याला मर्यादा नसते असे खूपदा ऐकलं आहे आपण. अपराध हा कोणाकडूनही कळत – नकळत होत असतो. असाच एक धक्कादायक गुन्हा समोर आला आहे. चक्क 2 अंध शिक्षकांनी आपल्या 15 वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना गुजरात मधील पालनपुर येथे घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बंसकांथा या जिल्ह्यातील अंबाजी या गावात एका खाजगी सेवाभावी संस्थेमार्फत अंध मुलांची शाळा चालविली जाते. त्याच शाळेतील पीडित मुलगी दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्या आत्ताच्या गावी गेली. सुट्टी संपल्यानंतर तिने शाळेत परत जाण्यासाठी नकार दिला. तिला कारण विचारताच तिने पूर्ण घटना आपल्या आत्याला सांगितली. गेल्या 4 महिन्यापासून चमन ठाकोर आणि जयंती ठाकोर या दोन्ही शिक्षकांनी तिच्या बलात्कार केल्याचे तिने सांगितले. आरोपी चमन चे वय 62 आणि आरोपी जयंती ठाकोर याचे वय 30 आहे.
ब्रेकअप नंतरच्या या गोष्टी नक्कीच तुमच्यासोबत पण झाल्या असतील….
पीडित मुलगी ही त्याच शाळेच्या वसतिगृहात राहायची. शाळेमधील म्युझिक रूम मध्ये असताना जयंती ठाकोर याने अगोदर बलात्कार केला होता व नंतर तीन दिवसाने चमन या साठी ओलांडलेल्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. परत त्यांनी नवरात्रीच्या काळातही तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने सांगितले. त्या दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून पुढील तपासणी चालू आहे.
सुन सोनीयो या गाण्यातील मुलगी आता दिसतेय खूपच सुंदर…पाहा फोटोज्
या घटनेमुळे गुन्हा हा कोणाकडूनही होवू शकतो हेच परत एकदा सिद्ध झाले आहे.