right time to drink water-for-good-health

Right time to drink water for healthy life. निरोगी शरीरासाठी दिवसातून कमीत कमी १० ते १२ ग्लास पाणी अवश्य प्यावे असे सांगितले जाते. जे लोक कमी पाणी पितात त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे लक्षात ठेवा की, तुमचे अर्धे पोट जेवणाने, एक चतुर्थांश भाग पाण्याने आणि शिल्लक 25 टक्के भाग हवेने भरलेले असावे. पाणी आपल्या आयुष्य आणि निरोगी शरीरासाठी आवश्यक आहे. यामुळे पाणी पिताना काही खास गोष्टींकडे लक्ष दिल्यास आपण आजारांपासून दूर राहू शकतो.

1. सकाळी झोपेतून उठल्यानंतर प्यावे १ ते २ ग्लास कोमट पाणी
सकाळी झोपेतून उठताच १ ते २ ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीरातील सर्व घाण बाहेर पडेल. त्वचा आणि पोट दोन्ही गोष्टी निरोगी राहण्यास मदत होईल.

2. जेवणाच्या अर्धातास अगोदर /नंतर 1 ग्लास कोमट पाणी प्यावे
जेवण करण्यापूर्वी तुम्ही पाणी प्यायले तर तुम्ही भुकेपेक्षा कमी जेवण कराल. यामुळे लठ्ठपणा वाढणार नाही तुमचे आतडेही व्यवस्थित काम करतील.

right time to drink water for good health

3. जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये
जेवण केल्यानंतर एक तासानेच पाणी प्यावे, कारण त्यापूर्वी पाणी प्यायल्यास पोटामध्ये अन्न पचवणाऱ्या रसायनाचा प्रभाव होत नाही आणि पाचन संबंधित अडचणी निर्माण होतात. जर तुम्ही जेवण केल्यानंतर लगेच भरपूर पाणी पिले तर अन्न लवकर पचणार नाही.

4. पाण्याएवजी दही, ताक, रायता इ. गोष्टींचे सेवन करा
जर तुम्हाला जेवताना जास्त पाणी पिण्याची सवय असेल तर पाण्याएवजी दही, ताक घ्यावे. यामुळे शरीराला थंडावा मिळेल आणि अन्नही सहजपणे पचण्यास मदत होईल.

5. थकवा आल्यास पाणी प्यावे
आपला मेंदू 75 टक्के पाण्याने भरलेला असतो. तुम्ही थकवा जाणवल्यानंतर पाणी प्यायल्यास तुमचा मेंदू चांगल्याप्रकारे काम करेल आणि तुमचे मनही पूर्णपणे कामात लागेल.

6. दिवसभर भरपूर पाणी प्यावे
दिवसभर भरपूर पाणी पीत राहावे आणि जसा जसा दिवस उतरत जाईल पाण्याचे प्रमाण कमी करत जावे. ज्यामुळे रात्री बाथरूमकडे वारंवार पळावे लागणार नाही.

वाचा : हा आयुर्वेदिक उपाय केल्यावर आपल्याला कधीच डास चावणार नाही

7. स्नान करण्यापूर्वी पाणी प्यावे
स्नान करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने ब्लडप्रेशर कमी करण्यास मदत मिळेल. जर तुम्ही गरम पाण्याचा शॉवर घेणार असाल तर स्नान करण्यापूर्वी थंड पाणी पिऊ नये.

8. व्यायाम करण्यापूर्वी आणि झाल्यानंतर प्यावे पाणी
केव्हाही व्यायाम सुरु करण्यापूर्वी पाणी पिणे खूप आवश्यक आहे, यामुळे मांसपेशींना उर्जा मिळते. पाणी प्यायल्यामुळे थकवा जास्त लागत नाही. जर तुम्ही पाणी प्यायले नाही तर तुम्हाला लवकर थकवा येऊ शकतो.

9. बाहेरच्या पाण्यापासून दूर राहा
बाहेरचे पाणी पिण्यापासून दूरच राहा. अशुद्ध पाणी प्यायल्याने लिव्हरशी संबंधित रोग होऊ शकतात.

10. आजारी व्यक्तीने, गरोदर स्त्रीने जास्त पाणी प्यावे
जर तुम्ही एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर पाणी प्यायल्याने तुमचे शरीर लवकर ठीक होऊ शकते. गरोदर महिलांनी सामान्य दिवसांच्या तुलनेत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. गरोदर महिलांनी दररोज 10 ग्लास पाणी अवश्य प्यावे.

11. उभे राहून पाणी पिऊ नये
मान्यतेनुसार उभे राहून पाणी प्यायल्याने वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर गुडघे दुखीःचा त्रास सुरु होतो. यामुळे उभे राहून पाणी पिऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published.