Second Wife 7 जन्म सुख आणि दुःखात सोबत राहण्याचे घेतलेले वचन म्हणजेच लग्न होय. पण सध्याच्या काळात खूप जण लग्नाला खेळ समजून काही क्षणात सर्व काही एका क्षणात संपवून टाकतात. बॉलिवुड मध्ये पण असे खूप कलाकार विभक्त झालेले दिसतात. Second Wife बॉलीवुड मध्ये अशा पण काही अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या पतीच्या दुसऱ्या पत्नी आहेत. पाहुयात कोण कोण आहेत त्या…
1. करीना कपूर : कपूर परिवारातील अत्यंत सुंदर दिसणारी ही मुलगी अभिनय क्षेत्रात आल्यापासून अत्यंत कमी वेळात तिने आपले नाव आघाडीच्या अभिनेत्री मध्ये नेऊन ठेवले. या अभिनेत्रीने आपल्या पेक्षा 11 वर्षाने मोठा असलेल्या सैफ अली खान सोबत लग्न केले. सैफने करिनाच्या अगोदर त्याच्यापेक्षा 12 वर्षाने मोठी असलेल्या अमृता सिंग सोबत लग्न केले होते. त्या दोघांना सारा अली खान ही मुलगी देखील आहे.
2. करिश्मा कपूर : करीना कपूर ची मोठी बहीण करिश्मा जिने एके काळी सैफ अली खान सोबत पण काम केले आहे. करिश्मा ने संजय कपूर सोबत विवाह केला होता. पण करिष्मा ही त्याची दुसरी बायको होती. संजयची पाहिली पत्नी नंदिता महतानी होती. कालांतराने करिश्मा आणि संजय यांचा पण डिव्होर्स झाला. आता संजय ने प्रिया सचदेव हिच्याशी तिसरा विवाह केला आहे.
3. विद्या बालन : सिद्धार्थ रॉय कपूर या निर्मात्या सोबत विद्या बालनचा विवाह झाला आहे. विद्या बालन ही एक अत्यंत उत्तम अभिनेत्री आहे. तुम्हाला ऐकुन आश्चर्य वाटेल की विद्या बालन ही तिच्या पतीची तिसरी बायको आहे. सिद्धार्थ चे आरती बजाज आणि कविता यांच्यासोबत अगोदरच लग्न झाले होते.
4. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला हिने पण अशा व्यक्तीसोबत लग्न केले आहे ज्याचा अगोदरच एक विवाह झाला होता. जय मेहता यांच्यासोबत तिचा विवाह झाला होता. जय मेहता यांनी सुजाता बिर्ला यांच्याशी लग्न केले होते. दुर्दैवाने सुजाता यांचे अकाली निधन झाले होते.
कोट्याधीश बनायचंय, करा फक्त एवढेच काम
5. सोनम कपूर : तुम्हाला हे नाव ऐकून धक्का बसला असेल. हो हे अगदी खरे आहे की सोनम कपूरचा पती आनंद अहुजा याचा पण अगोदरच एक विवाह झाला होता. आनंदचे पेरणीया कुरेशी या फॅशन डिझायनर सोबत अगोदरच लग्न झाले होते.
बॉलिवुड मधील हे गोलमाल वाचून तुम्हीही अचंबित झाला असाल. माहिती आवडली तर शेयर करा..