Sharad Kelkar Wife सोशल मीडिया वर सध्या एका चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे. Sharad Kelkar Wife तो चित्रपट म्हणजेच “तानाजी – द अनसंग वॉरियर” हा होय. बिग बजेट असलेल्या या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल असे मोठे कलाकार दिसणार आहेत. अजय देवगण तानाजी मालुसरेची भूमिका वठविणार आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलर ची खूपच चर्चा होत आहे. काहींनी विरोध केला तर काहींना खूपच आवडले. ट्रेलर प्रदर्शनाच्या दिवशी जे काही घडले त्यावरून चित्रपटात शिवरायांची भूमिका साकारणारा अभिनेता “शरद केळकर” खूपच चर्चेत आला. त्यावेळी पत्रकाराने शरद केळकर ना प्रश्न विचारताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. त्यावेळी शरद ने सडेतोड उत्तर देत असे म्हणाले, “मी शिवाजीची भूमिका केली नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे”. त्यावेळी सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचा आदर केला.

याच शरद केळकर ची खऱ्या जीवनातील पत्नी दिसायला खूपच सुंदर आहे. त्यांच्या पत्नीचे नाव कीर्ती गायकवाड असून दोघांचा विवाह 2005 मध्ये झाला. “सात फेरे” या लोकप्रिय हिंदी मालिकेत किर्ती आणि शरद यांनी एकत्र काम केले होते व तिथेच दोघांना प्रेम झाले. दोघांना एक मुलगी असून तिचे नाव किशा आहे. “सात फेरे” सोबतच किर्ती ने छोटी बहू, ससूराल सिमर का अशा फेमस मालिकेत काम केले. एका डान्स रियालिटी शो मध्ये पण किर्ती दिसली होती.

मदन ची खऱ्या आयुष्यातील बायको दिसते खूपच सुंदर..

शरद ने पण रामलीला, मोहन जोदारो, रॉकी हँडसम, हलचल अशा अने हिंदी चित्रपटात काम केले आहे. काही वर्षांपूर्वी गाजलेला बाहुबली या चित्रपटाला शरद ने हिंदी डबिंग केली होती.

माहिती आवडल्यास share करायला विसरू नका ……………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *