आपले आयुष्य कुठपर्यंत असेल याचा कोणालाच अंदाज नसतो. कधी कधी अशा काही व्यक्ती आपणाला कायमचे सोडून जातात ज्यांची कमी भरून काढणे शक्य नसते. असेच काही आज नाशिकच्या तसेच महाराष्ट्रातील लोकांना वाटत असावे.
आज नाशिककरांना एक दुःखद धक्का बसला आहे. नाशिकची एक प्रसिद्ध गायिका “गीता माळी” हीचे आज दिनांक 14 नोव्हेबर रोजी अत्यंत दुःखद रित्या निधन झाले आहे. जिच्या आवाजाचा अख्खा नाशिक दिवाना होता. सर्वजण तिला नाशिकची शान म्हणून ओळखायचे. खूप लोकांनी तिला नाशिकची गान कोकिळा अशी देखील उपमा दिली होती. आज तीच गानकोकिळा नाशिककरांना कायमच सोडून गेली.
गीता माळी गेली 2 महिने अमेरिकेत आपल्या गाण्याचे कार्यक्रम करीत होती. सगळे कार्यक्रम आटोपल्या नंतर ती गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबई येथे उतरली. विमानतळावरून गीता आपले पती विजय माळी यांच्यासोबत कारमध्ये नाशिकच्या दिशेने निघाले होते. ठाण्याजवळ आले असताना एका पेट्रोल पंपासमोर कार आली असताना कारसमोर एक कुत्रा अाला. विजय माळी यांनी कुत्र्याला वाचविण्याच्या नादात कार जोरात वळवली आणि रोड शेजारी उभे असलेल्या टँकर मागून धडकली. यात गीता माळी यांचा जागीच मृत्यु झाला. पती विजय माळी हे गंभीर जखमी झाले आहेत.
आज सकाळीच गीताने मुंबई विमानळावर उतरलेली पोस्ट तिच्या फेसबुक अकाऊंट वर पोस्ट केली. तिच्या जाण्याने सगळीकडे शोककळा पसरली आहे.