sip and mutual fund are good options for saving money

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया च्या आकड्यांनुसार या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात SIP मध्ये केलेली गुंतवणूक वाढून ती 57 हजार 607 कोटींवर पोहोचली.

म्युच्युअल फंड उद्योगाने SIP च्या माध्यमातून 8 हजार 246 कोटी रुपये जमवले आहेत. शेअर बाजारातली तेजी आणि सरकारने केलेल्या सुधारणांमुळे म्युच्युअल फंड उद्योगात SIP ची गुंतवणूक वाढली आहे.

म्युच्युअल फंड उद्योगात एकूण 44 कंपन्या काम करतायत. इक्विटी फंडमधल्या गुंतवणुकीसाठी या कंपन्या SIP वर अवलंबून असतात.

SIP मध्ये करा गुंतवणूक

FD म्हणजेच फिक्स डिपॉझिटमध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित आहे. पण त्याहीपेक्षा SIP मध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षितही आहे आणि त्यात जास्त फायदाही आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.

SIP हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे. यामध्ये गुंतवणुकीतला धोकाही कमी होतो आणि चांगला फायदा मिळतो. शिवाय म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक तुम्ही पाहिजे तेव्हा थांबवू शकता. असं केलं तर दंडही लागत नाही.

SIP च्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक दीर्घपल्ल्यासाठी चांगली आहे. महागाईच्या दिवसांत अशा गुंतवणुकीची मदत होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *