Smita patil “स्मिता पाटील” हे नाव ऐकताच घायाळ करणारे ते सौंदर्य डोळ्यासमोर येते. 80 च्या दशकातील Smita patil या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाची आणि आपल्या सौंदर्याची छाप प्रेक्षकांवर पाडली होती. Smita patil त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटातही आपली छाप पाडली होती. दिग्गज अभिनेते राज बब्बर प्रेम प्रकरण सुरू झाले व ते काही काळानंतर विवाह सुद्धा केला.
स्मिता पाटील ज्या काळात अभिनय करायची त्या काळी सौदर्य प्रसाधनाची साधने जास्त नव्हती. तसेच, कॅमेरा आणि व्हिडिओ एडिटिंग जास्त अग्रेसर नव्हते. तरी सुद्धा स्मिता पाटील या निखळून समोर येत असे. त्या काळातील युवा पिढीचे ती आकर्षण होती. मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत त्या काळातील ती आघाडीची अभिनेत्री होती. तिचे अचानक निघून जाण्याने चित्रपटसृष्टीने एक हिरा गमावला. अखेर स्मिताचा मृत्यू नेमके कसा झाला.
नंदीताने केले आहे क्राईम पेट्रोल मध्ये काम.. फोटो पाहून विश्वास बसणार नाही
राज बब्बर या प्रसिद्ध अभिनेता सोबत स्मिताने विवाह केल्या नंतर 28 नोव्हेंबर 1986 ला एका मुलाला जन्म दिला. जन्मावेळी बाळ आणि स्मिताची तब्येत एकदम ठीक होती. 2 आठवडे स्मिताला कसलाच काही त्रास नव्हता. 12 डिसेंबर 1986 ला राज बब्बर नाईट शिफ्ट करून आले आणि झोपी गेले. बाळ रडू लागल्याने स्मिता बाळाला घेऊन दुसऱ्या रूम मध्ये गेली. स्मिता सोबत तिची बहीण माया पण होती. स्मिताने मायाला म्हटले की मी लवकर ठीक व्हावे यासाठी प्रार्थना कर. त्यावेळी मायाने तिला रागावून म्हटले, तुला असे काय झाले आहे.. अशी का बोलत आहे तू? त्यावेळी स्मिताने म्हटले मला ठीक नाही वाटत. त्यादिवशी स्मिताला ताप आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 13 डिसेंबरला स्मिताला डॉक्टर ने चेक करून सांगितले सगळं नॉर्मल आहे.
संध्याकाळी राज बब्बर एका कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाला होता तेंव्हा स्मिताने मलाही सोबत यायचे आहे म्हटले पण राज ने तिला नकार दिला. काही वेळाने स्मिता अचानक रक्ताच्या उलट्या करू लागली आणि तिचे अंग पिवळे पडले होते. तिला ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आले पण दवाखान्यात नेईपर्यंत स्मिता कोमात गेली व काही वेळातच तिचा मृत्यु झाला. तिचे असे अचानक जाणे सर्वांसाठी खूप मोठा धक्का होता. मुलगा प्रतीक बब्बरला जन्म दिल्यानंतर Child Birth Complication मुळे तिचा मृत्यु झाला, असे डॉक्टर नी सांगितले.
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका