Subodh Bhave – “सुबोध भावे” हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नाव. त्यांचा अभिनय, त्यांचे हावभाव, प्रेक्षकांना आपलेसे करणे, त्यांचे सामाजिक कार्यात अग्रेसर राहणे यासर्व गोष्टी सुबोध भावे यांना बाकी कलाकारांपेक्षा वेगळं करतात. त्यामुळेच त्यांचे असंख्य चाहते संपूर्ण जगभरात आहेत.
सुबोध भावे यांचा वाढदिवस काही दिवसावरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे अशातच त्यांच्या फॅन्स कडून शुभेच्छा येणे साहजिकच आहे. वाढदिवस 9 नोव्हेंबर ला असताना कालच काही subidhins नी अचानक ठाणे शहरात जाऊन अशा प्रकारे वाढदिवस साजरा केला की सुबोध भावे सुद्धा गहिवरून गेले.
जेंव्हा सुबोध भावे रॅम्प वॉक करतात… बघा व्हिडिओ
शनिवार, दिनांक २ नोव्हेंबर २०१९ रोजी सुबोध सरांच्या पुणे, मुंबई व बाकी शहरातील काही महिला फॅन्स नी सुबोध भावेंचा वाढदिवस 2 तारखेला तिथीनुसार करण्याचे ठरविले. ठाण्यात गडकरी रंगायतनला “अश्रूंची झाली फुले” या नाटकाचा प्रयोग होता. ते औचित्य साधून सर्व पुण्यातील फॅन्स ठाण्यात जाऊन थडकले. काही फॅन्स नी या कार्यासाठी मदत केली पण ते येऊ शकले नाहीत. मुंबईमधील सुबोधियन्सनी खूप सुंदर योजना बनवली होती.
प्रेक्षकांसाठी आले आहे एक नवीन गाणे.. सुबोध भावे आणि गायत्री काय म्हणतात, पाहा व्हिडिओ
ठाण्यात घोडबंदर रोडवर असलेल्या “दत्ता केअर फाऊंडेशन”या वृध्दाश्रमातील आजी आजोबांना आपल्या आनंदात सहभागी करून घेत सर्व चाहत्यांनी मिळून त्या संस्थेला काही देणगी देऊ केली. या देणगीतून आजी आजोबांचे त्या दिवसाचे जेवण प्रायोजित करण्यात आले. वृध्दाश्रमातील आजी आजोबांनी पण याचा खूप आनंद लुटला. त्यातील काही जण तर सुबोध सरचे चाहते होते व त्यांनी सुबोध सर ना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
सायंकाळी नाटकाच्या प्रयोगाआधी अगदी काही मिनिटे असताना सुबोध भावे यांनी हे ‘सरप्राईज’ पाहून भारावून गेले. वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा केला हे ऐकुन सुबोध भावे पण खूप खुश झाले. व त्यांनी तशी टि्वटर वर पोस्ट देखील टाकली.
I'm so proud of you all https://t.co/gbSJBqrSaN
— सुबोध भावे (@subodhbhave) November 2, 2019
हे सुंदर कार्य करून सर्व फॅन्स नी एक आदर्श निर्माण केला. त्यासाठी सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
माहिती आवडली तर नक्की शेयर करा.