Subodh Bhave latest मराठी इंडस्ट्रीतील एक हाडाचा कलाकार म्हणून ज्यांना ओळखले जाते, असे सर्वांचे लाडके सुबोध भावे Subodh Bhave latestयांचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग नेहमीच उत्सुक असतो. मग ते चित्रपटातून असो वा मालिकांमधून असो. सुबोध भावे यांच्या नाटकाचे शो पण नेहमीच हाऊसफुल झालेले दिसतात.
“तुला पाहते रे” या झी मराठीवरील मालिकेतून सुबोध भावे यांनी खूप वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले होते. या मालिकेला व सुबोध यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी खूपच पसंद केले. पण मालिकेने लवकर निरोप घेतल्याने प्रेक्षक खूपच नाराज झाले होते. खूप जणांनी अशी ईच्छाही दाखविली की सुबोध भावे यांनी परत टिव्हीवर दिसावे.
प्रेक्षकांसाठी आले आहे एक नवीन गाणे.. सुबोध भावे आणि गायत्री काय म्हणतात, पाहा व्हिडिओ
आता सुबोध भावे यांच्या फॅन्स साठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सुबोध भावे परत एकदा सर्वांना छोट्या पडद्यावर भेटायला येणार आहेत. यावेळेस ते वेगळ्याच रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत.सोनी मराठी या वाहिनीवर “महाराष्ट्राची खरी शान महाराष्ट्राची लोककला” अशी टॅग लाईन घेऊन “जय जय महाराष्ट्र माझा” हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात कलाकार आपापली महाराष्ट्रीयन कला सादर करतील व सुबोध भावे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसतील. हा कार्यक्रम 2 डिसेंबर पासून सोम आणि मंगळवार सोनी मराठीवर दिसेल.
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका