मागील काही दिवसापासून सुबोध भावेंच्या (Subodh bhave) काही फोटोज् वायरल होत आहेत. जॅकेट – कुर्ता – पायजमा असा पेहराव असलेल्या पेहराव असलेल्या लुक मध्ये सुबोध भावे (Subodh bhave)अत्यंत आकर्षक दिसत होते. सुबोध भावे (Subodh bhave) ना सर्वांनी खूपदा अशा पेहरावात पाहिले आहे. त्यांनी हा लुक कोणत्या कार्यक्रमासाठी बनविला होता व त्यांचे पोशाख कोण तयार करतात याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सुबोध भावे यांना प्रेक्षक नेहमी वेगवेगळ्या लुक पाहत असतात. प्रत्येक लुक मध्ये ते मस्तच दिसत असतात. 2 दिवसापूर्वी घातलेल्या पोशाखात पण ते रुबाबदार दिसत होते. हा पोशाख त्यांनी यापूर्वीही “तुला पाहते रे” मालिकेत काही वेळा परिधान केला होता.

प्रेक्षकांसाठी आले आहे एक नवीन गाणे.. सुबोध भावे आणि गायत्री काय म्हणतात, पाहा व्हिडिओ
गेल्या दीड वर्षापासून सुबोध भावेंचे कपड्याचे डिझाईन चे काम पुण्यातील फॅशन डिझायनर “मयुरी मोहोळ” पाहत आहेत. मयुरी मोहोळ यांचे पुण्यात kriyansh couture एक कपड्याचे दालन आहे. तुला पाहते रे मालिकेसाठी पण खूपदा त्यांनी स्वतः डिझाईन केलेले पोशाख दिले होते.

2 दिवसापासून वायरल झालेल्या सुबोध भावेंच्या या फोटोज् कोणत्या कार्यक्रमातील नसून kriyansh fashion walk 2019 येथील आहेत. मयुरी मोहोळ यांनीच या इव्हेंट चे आयोजन केलेले होते. नवीन कपड्यांचे डिझाईन दाखविण्याचा मूळ हेतू होता. त्यामुळेच सुबोध भावे यांना बोलाविण्यात आले होते. यावेळी त्यांनी सुंदर पोशाख घालून स्टेज वरून आयुष्यातील पहिल्यांदा रॅम्प वॉक केला, असे त्यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्ट द्वारे सांगितले होते. त्याचाच हा एक व्हिडिओ …
माहिती आवडली तर नक्की शेयर करा