Traffic control by Dancing Girl Shubhi jain

Traffic control by Dancing Girl ट्राफिक प्रॉब्लेम हा मेट्रो सिटी  सारख्या ठिकाणी सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे.यावर मात करा पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेज मधून MBA पूर्ण केलेली शुभि जैन ही इंदौर येथे ट्राफिक कंट्रोल करत सर्वाना प्रभावित केले आहे. Traffic control by Dancing Girl पुण्यातील सिम्बायोसिस कॉलजची 23 वर्षीय शुभी जैन विद्यार्थीनी आहे. ती इंदूरमधील रहदारी सुधारण्यासाठी इंटर्नशिपवर आली आहे. आपल्या अनोख्या शैलीत ट्रॅफिक कंट्रोल करत असल्यामुळे एमबीएची विद्यार्थीनी शुभी जैन ही डान्ससोबत ट्रॅफिक कंट्रोल करते. पोलिसांसोबत शुभी स्वयंसेवक म्हणून काम करत आहे.

Traffic control by Dancing Girl Shubhi jain
सोशल मीडियावर शुभी जैनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एडीजी वरुण कपूर यांनी तिचा सन्मान केला. शभीने सांगितले की, ती रहदारी जनजागृती अभियानात सामील होऊन केवळ लोकांना जागरूक करत नाही, तर तिचे मित्र आणि परिवाराच्या लोकांना देखील या वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी जागरूक करते.

लाल सिग्नलवर वाहनचालक थांबताच ती त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना वाहतूकीचे नियम समजावून सांगते. दुचाकीवर हेलमेट वापरणाऱ्यांवर ती सॅल्यूट करते आणि हेलमेट ज्यांनी नाही घातले त्यांना हात जोडून हेलमेट परिधान करण्याची विनंती करते. त्याचबरोबर ती कार चालकांना सीट बेल्ट लावण्याचा आग्रह करते.या अश्या आपल्या अनोख्या स्टाईल ने सर्वाना प्रभावित केले आहे.पहा व्हिडीओ

माहिती आवडल्यास share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *