Twins-of-deepika-padukon असे म्हणतात जगात एखाद्या व्यक्ती सारखे हुबेहूब दिसणारे 7 चेहरे असतात. जास्त करून जुळ्या भावंडांमध्ये अशी चेहऱ्यातील समानता दिसून येते असते. पण कधी कधी रक्ताचे नाते नसून देखील 2 व्यक्ती एक सारख्या दिसत असतात. Twins-of-deepika-padukon तसेच काही घडले आहे एका मराठी अभिनेत्रीच्या बाबतीत. ऋतुजा राजन बागवे असे या मराठी अभिनेत्रीचे नाव आहे. तिचा चेहरा हुबेहूब दीपिका पादुकोण सारखा दिसतो आणि हीच गोष्ट खूप लोकांनी तिला म्हटली पण आहे.
9 सप्टेंबर 1988 ला मुंबई येथे ऋतुजाचा जन्म झाला. ऋतुजाने रामनारायण रुईया महाविद्यालयात B.SC पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तिला लहानपणापासून अभिनायची आवड नव्हती. कॉलेजचे शिक्षण चालू असताना एकांकिका स्पर्धेत ती भाग घेऊ लागली व अशा स्पर्धेत तिला खूप पारितोषके मिळू लागली. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला व ती अभिनय क्षेत्रात उतरली. दीपिका सारखी दिसणारी अभिनेत्री म्हणून तिची खूप चर्चा झाली.
ऋतुजा हिने काही मराठी मालिकेमध्ये पण काम केले आहे. झी मराठी वरील काही वर्षांपूर्वी येऊन गेलेली “नांदा सौख्यभरे” खूप गाजली. तिच्या “अनन्या” या नाटकाची पण सर्वत्र चर्चा झाली. या नाटकात ऋतूजाने मुख्य भूमिका केली होती व त्या नाटकाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले.
ऋतुजाला एका मुलाखतीत आवडती अभिनेत्री असे विचारले असता तिने दीपिकाचे नाव न घेता विद्या बालन, रेखा यांचे नाव घेतले. पण मागे तिला चला हवा येऊ द्या या शो मध्ये निलेश साबळे याने पण तिला दीपिका पादुकोण सारखी दिसते असे म्हटले होते. तिच्या या काही फोटोज् पाहून तुम्हाला पण ती थोडीफार दीपिका सारखी दिसते असेच वाटतं असणार.
पुण्यातील सिम्बायोसिस कॉलजची विद्यार्थीनी अनोख्या पद्धतीने ट्रॅफिक कंट्रोल
माहिती आवडली तर नक्की शेयर करा