what to do if police does not register our FIR

What to do if police does not register our FIR? आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे, “शहाण्याने पोलिस स्टेशनची पायरी चढू नये !” यामागे अनेक अनुभव असतात. वर्षानुवर्षे चालणारे खटले, त्यातून होणारे आर्थिक, मानसिक नुकसान जास्त असते. पण आपल्यासोबत कधीकधी असे प्रसंग घडतात कि आपल्याला पोलिस स्टेशनला जाण्याची वेळ येते.

what to do if police does not register our FIR

पोलिस अधिकाऱ्यांकडून प्राथमिक माहिती अहवाल दाखल करायला नकार देण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. भारतीय कायद्यानुसार वेगवेगळ्या आरोपांना दोन वेगवेगळ्या प्रकारात विभागले जाते, दखलपात्र आणि अदखलपात्र ! पोलिस अधिकारी केवळ दखलपत्र आरोपांबाबतच FIR नोंदवणं घेतात.

पुण्यातील सिम्बायोसिस कॉलजची विद्यार्थीनी अनोख्या पद्धतीने ट्रॅफिक कंट्रोल Traffic control by Dancing Girl

अदखलपात्र अपराधांसाठी पोलिस अधिकाऱ्यांना मॅजिस्ट्रेट कडून विशेष कारवाईच्या सूचना दिल्या जातात. दखलपात्र गुन्ह्यांत बलात्कार, दंगा, दरोडे किंवा लूट आणि खून हे गुन्हे येतात. तर अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये बनावटपणा, सार्वजनिक उपद्रव आणि फसवणूक यांचा समावेश आहे.

what to do if police does not register our FIR

FIR म्हणजे प्राथमिक माहिती अहवाल ! हा एक महत्वाचा दस्तऐवज असून यामध्ये घडलेल्या गुन्ह्याबाबत प्राथमिक माहिती घेण्यात येते. FIR दाखल केल्याशिवाय गुन्ह्याची प्राथमिक चौकशी करता येत नाही. म्हणुन FIR च नोंदवला नसेल तर गुन्ह्याचा तपास कसा करणार ?

jcb bull news indapur..अखेर JCB ने बैलाला ठार करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

जर संबंधीत पोलिस अधिकारी FIR दाखल करुन घेत नसतील तर कलम १५४ (२) अन्वये त्याची तक्रार जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांना लेखी स्वरुपात करता येऊ शकते. त्यानंतर संबंधित पोलीस अधीक्षक स्वतः FIR लिहुन घेऊ शकतात किंवा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना FIR दाखल करुन घेण्याचा आदेश देऊ शकतात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *