Yavatmal New News about preganant woman

Yavatmal New News  मनुष्य जन्म हा बाकी प्राण्यांपेक्षा अत्यंत सुंदर मानला जातो. कोणतीही महिला 9 महिने त्रास सहन करीत आपल्या बाळाला पोटात वाढवीत असते. 9 महिन्याचा हा त्रास प्रत्येक महिलेला तिच्या आनंदापुढे काहीच नसतो. बाळाला जन्म देण्या अगोदर महिलेला कळा येऊ लागल्यास तिला अगोदरच दवाखान्यात नेण्यात येत असते.  Yavatmal New News  वेळेवर प्रसूती केली तर बाळ व बाळाची आईला धोका कमी असतो.

30-40 वर्षांपूर्वी पुरेशा सुविधा नसल्या कारणाने महिलांची प्रसूती घरी तरी केली जायची किंवा डॉक्टर ला घरी बोलाविले जात असे. कधी कधी डॉक्टर कडे पायी घेऊन जात असताना वाटतेच कोणाच्या तरी घरी काही महिलांची प्रसूती होत असे. अशीच काही तरी घटना महाराष्ट्रात घडली आहे. दिनांक 28-11-2019 रोजी एक महिला प्रसूतीसाठी बस ने अकोट या गावातून यवतमाळ ला जात होती.

सकारात्मक दृष्टीकोन : हृदयस्पर्शी कहाणी

बस आपल्या दिशेने निघाली असताना धानोरा पाटीजवळ आली असताना बस मधील त्या महिलेला वेदना होवू लागल्या.  Yavatmal New News about pregnant woman बसचे चालक व्ही. ए. इंगळे व वाहक ए. के. जाधव हे आपल्या ड्युटीवर असताना त्यांनी महिलेची अवस्था पाहून बस सरळ शासकीय रुग्णालयाकडे वळविली. पण त्या महिलेकडे बाळाला जन्म देण्यासाठी वेळ खूपच कमी असल्याने बसमधील अन्य महिलेच्या मदतीने त्या महिलेची प्रसूती बसमध्येच करण्यात आली.

 Yavatmal New News about preganant woman

सर्वांच्या मदतीमुळे तिने एका गोड मुलीला जन्म दिला व सर्वांनी आनंद साजरा केला. पण चालक आणि वाहक यांनी बसला सरळ शासकीय रुग्णालयाकडे केले. बस मध्ये काही नर्स नी जाऊन महिलेला व बाळाला तपासले व दोघांनी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महाराष्ट्र राज मार्ग परिवहन महमंडळ चे वाहक व चालक यांनी केलेल्या या कार्याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यांच्या या कार्याला आमचा मनाचा मुजरा.

 Yavatmal New News about pregnant woman

माहिती आवडल्यास share करायला विसरू नका ……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *