Aggabai Sasubai झी मराठीवरील सध्या चालू असलेल्या मालिकापैकी “अग्गबाई सासूबाई” ही मालिका प्रेक्षकांना खूपच पसंद पडत आहे. मालिकेत होत असलेले चढ उतार प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. मालिकेत निवेदिता सराफ यांनी आसावरीची तर गिरीष ओक यांनी अभिजीत राजेंची भूमिका केली आहे.
मालिकेच्या सुरुवातीपासून आसावरी आणि अभिजीत एकमेकांना पसंद करीत असल्याचे दाखविण्यात येत होते. दोघांची अगोदर मैत्री झाली व नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याचे दाखविण्यात आले. Aggabai Sasubai आसावरी तीचा सासऱ्याला (रवी पटवर्धन) खूप घाबरत असल्याने ती काही प्रेमाला पूर्णपणे होकार देत नव्हती. काही दिवसापूर्वी अभिजित राजेंनी चक्क आसावरीच्या घरी येऊन चक्क तीच्या सासऱ्या समोर आपले प्रेम व्यक्त केले आहे. आसावरी च्या सासऱ्याचे आणि अभिजित चे अगोदर पासूनच चांगले संबंध नसल्याने त्यांनी या नात्याला विरोध केला. नंतर एका एपिसोड मध्ये प्रज्ञा कारखानीस ही आसावरीस हिरव्या बांगड्या घालायला लावते. हे पाहून तीच्या सासऱ्याचा राग आणखीन वाढतो व ते नंतर आसावरी साठी स्थळ शोधायला सुरुवात करतात. वर्तमानपत्रात तशी एक जाहिरात पण देतात. ही जाहिरात पाहून एक व्यक्ती त्यांच्या घरी आलेला दाखविण्यात येत आहे.
या व्यक्तीला अगोदर कुठेतरी पाहिल्याचे प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे. खूप प्रेक्षकांनी त्या व्यक्तीला ओळखलेही असेल, पण काहींनी वेगळ्या गेटअप मुळे ओळखले नसावे. मालिकेत आलेल्या या नवीन व्यक्तीचे खरे नाव आहे महेश कोकाटे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत अण्णाजी दत्तो यांची भूमिका यांची भूमिका करणारे हे तेच महेश कोकाटे आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत त्यांनी केलेली विरोधी भूमिका प्रेक्षकांना कलाकार म्हणून खूपच आवडली. याचीच पोचपावती म्हणून त्यांना अग्गबाई सासूबाई या मालिकेत काम करण्याची संधी मिळत आहे. पाहुयात पुढे मालिकेत आणखीन किती वळणे येतील ते.
तुला पाहते रे च्या डायरेक्टर सोबत गायत्री दिसणार रोमँटिक रुपात
माहिती आवडली तर नक्की शेयर करा