ambejogai rape case news

Ambejogai News बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे शाळेतीलच नववीत शिकणाऱ्या विध्यार्थिनी वर शाळेतीलच क्रीडा शिक्षकाने बलात्कार करण्याची घटना घडली आहे.Ambejogai rape case Newsया घटनेचे  तीव्र पडसाद शहरात उमटले आहेत.

अंबाजोगाई येथे एका शिक्षकाने विद्यार्थीनीवर केलेल्या बलात्काराच्या घटनेची गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी तीव्र शब्दांत निंदा केली असून खेदही व्यक्त केला आहे. Ambejogai News शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणा-या सदर शिक्षकांस कठोर शासन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

“नववी इयत्तेत शिक्षण घेणा-या एका विद्यार्थ्यांनीवर शाळेतीलच शाम वरकड नावाच्या एका क्रीडा शिक्षकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली, यासंदर्भात पोलिसात दिलेल्या तक्रारी नंतर संबंधित शिक्षकाला अटक करून गुन्हाही दाखल झाला आहे तथापि अंबाजोगाई सारख्या सुसंस्कृत शहरात घडलेल्या हया घृणास्पद प्रकाराने प्रचंड संताप व्यक्त होत आहे, या घटनेची मी तीव्र निंदा व खेद व्यक्त करते. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी “असेही त्यांनी म्हटले आहे.

सोशाल मिडिया वर हि त्याचे प्रतिसाद उमटत आहेत. या बद्दल काही व्यक्तींनी हैद्राबाद सारखा फैसला करून टाकावा अशीही मागणी करीत आहेत.हि घटना म्हणजे शिक्षण क्षेत्रास काळीमा फासणारी घटना आहे.शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणा-या आरोपींवर कठोर शासन करण्याची मागणी सर्वांकडून होत आहे.

ज्येष्ठ अभिनेत्याचे पुण्यातील राहत्या घरीच निधन

माहिती share नक्की करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *