Archana Judge Bihar News स्वप्न पाहणे सोपी गोष्ट असते पण ते मिळवण्यासाठी जीवाचे रान करावे लागते अशीच एक बिहार मध्ये अर्चना नावाच्या व्यक्ती बरोबर घटना घडली आहे .Archana Judge Bihar News जर खरच मुलीना जर चांगले वातात्वरण मिळाले तर मुली पण आपल्या आई वडिलांसाठी खूप काही करू शकतात याचाच उदाहरण म्हणजे पटनाच्या कंकडबाग येथे राहणाऱ्या अर्चनाची बिहार न्यायिक सेवा स्पर्धा परिक्षेत निवड झाली आहे. Archana Judge Bihar Newsतिचे वडील गौरीनंदन सारण जिल्ह्यातील सोनपूर बिहार न्यायालयात शिपाई होते.
अर्चनाने पुढे सांगितले की, स्वप्न तर न्यायाधीश बनण्याचे बघितले होते. Archana Judge Bihar News मात्र हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. विवाहित आणि एका मुलाची आई असताना देखील हार न मानता स्वप्न पुर्ण केले.Archana Judge Bihar News अर्चनाने शास्त्रीनगर राजकीय उच्च विद्यालयातून 12 वीचे शिक्षण घेतले. त्यानंतर पटना युनिवर्सिटीमधून पुढील शिक्षण घेतले.न्यायालयात एकेकाळी शिपाईची नोकरी करणाऱ्यांची मुलगी आज न्यायाधीश बनली आहे.परंतु हे चित्र पाहण्यासाठी तिचे वडील या जगात नाहीत.
अर्चनाने सांगितले की, तिचे वडील गौरीनंदन दररोज कोणत्यातरी न्यायाधीशासाठी काम करत असे.मला ते आवडत नसे. त्याचवेळी तिने शिकत असताना शिपाई क्वार्टरमध्ये न्यायाधीश बनण्याचे स्वप्न बघितले होते आणि आज देवाने ते पुर्ण केले आहे.
जेनीने अपघात झालेल्या व्यक्तीचे अशा प्रकारे प्राण वाचविले.. वाचून अभिमान वाटेल
अर्चनाने सांगितले की, तिने 5 वर्षांच्या मुलासोबत दिल्लीत अभ्यास देखील केला व कोचिंग देखील चालवले. परंतू आपले स्वप्न नेहमी पुढे ठेवले. अनेक अडचणी आल्या मात्र स्वप्न काही सोडले नाही. आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात तिने परिक्षेत यश मिळवले.अर्चना सांगते की, लग्न झाल्यावर वाटले की तिचे स्वप्न पुर्ण होणार नाही. मात्र परिस्थिती बदलली व अर्चनाने पुणे विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर पटनाला परतून तीने 2014 ला बीएमटी लॉ कॉलेजमधून एलएलएमचे शिक्षण पुर्ण केले.
तुम्ही हि तुमची स्वप्न पहिली असतीलच तर ते पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करावे लागेल. अर्चनाच्या या जिद्दी मुलेच ती आज तिचे स्वप्न पूर्ण करू शकली. तुमच्या सर्वांची स्वप्न पूर्ण होवोत हीच सदिच्छा.
माहिती आवडल्यास share नक्की करा