army chief सध्याचे लष्कर प्रमुख बिपीन रावत हे 31 डिसेंबरला निवृत्त होत आहेत.army chief News in marathi त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद घटना घडलीय. देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. नरवणे हे देशाचे 28वे लष्कर प्रमुख असतील.
Lt Gen MM Naravane to be next Army Chief
Read @ANI Story | https://t.co/Gx1CMgREdD pic.twitter.com/4kZGSZBEnk
— ANI Digital (@ani_digital) December 16, 2019
आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत नरवणे यांनी लष्करातल्या विविध पदांवर आणि विविध भागांमध्ये उत्तम काम केलंय.army chief News नरवणे यांची काही महिन्यांपूर्वीच लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नरवणे हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे नवे लष्कप्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. रावत हे 31 डिसेंबरला निवृत्त होत आहेत.मनोज नरवणे राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि भारतीय सैन्य अकादमीचे माजी विद्यार्धी आहेत.
मृणाल दुसानिसचे नवऱ्या सोबतचे न पाहिलेले फोटोज् पाहा..
1980 मध्ये त्यांनी शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या 7व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधीनीचे ते विद्यार्थी आहेत. त्यांचे वडिलही हवाईदलात अधिकारी होते. नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन काम आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या क्षेत्रात उत्तम काम केलंय. त्यांना आत्तापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. या आधी जनरल अरूणकुमार वैद्य यांनी लष्कर प्रमुखपद भुषवलं होत.
माहिती share करायला विसरू नका ……………..