Atpadi Nights

Atpadi Nights भारतीय संस्कृतीमध्ये व प्रत्येकाच्या जीवनातला  महत्त्वपूर्ण घटक म्हणजे लग्न होय. मात्र लग्नाच्या नंतर  महत्त्वपूर्ण अशा पहिल्या रात्रीच्या विषयावर आपल्याकडे कधीच उघडपणे आणि गंभीर चर्चा होत नाही. साहजिकच आपली तरुण पिढी जमेल त्या मार्गाने म्हणजे मित्र, मैत्रीणी किंवा इंटरनेट अशा विविध माध्यमातून त्याबद्दलची माहिती मिळविली जाते.

Atpadi Nights

चित्रपटाची कथा एका संवेदनशील अशा सामाजिक विषयावर साध्या सोप्या भाषेत, हलक्या फुलक्या विनोदाच्या माध्यमातून खुमासदार शैलीत भाष्य करते.’आटपाडी नाईट्स’ हा चित्रपट साधारण मसाला चित्रपटापेक्षा अतिशय वेगळा आहेअश्याच  एका लग्नाची चटकदार कहाणी म्हणून आगामी ‘आटपाडी नाईट्स’ हा चित्रपट सर्वच माध्यमात चर्चेत आहे. मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर आहेत. ‘आटपाडी नाईट्स’ ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील वश्या आणि प्रिया या नवविवाहित जोडप्याची कथा आहे.

‘आटपाडी नाईट्स’मध्ये प्रणव रावराणे, सायली संजीव, संजय कुलकर्णी, छाया कदम, समीर खांडेकर, आरती वडगबाळकर, योगेश इरतकर, विठ्ठल काळे, जतिन इनामदार, प्रशांत जाधव, शितल कलापुरे, चैत्राली रोडे, श्वेता परदेशी, बालकलाकार ओम ठाकूर यांच्या भूमिका आहेत. Atpadi Nights Movie तर अभिनेता सुबोध भावे डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कमलेश कुलकर्णी, नारायण पुरी यांची गीते असून विजय गवंडे, सिद्धार्थ धुकटे यांनी संगीतबद्ध केली आहेत.

Atpadi Nights

काहीतरी वेगळी कहाणी असलेल्या फिल्म मध्ये  पहिल्या पोस्टरपासून ‘आटपाडी नाईट्स’बद्दल प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली उत्सुकता टीजर, ट्रेलर यामधून अधिकाधिक वाढत गेली. तसेच ‘प्रेमाचा जांगडगुत्ता ग’ हे गाणे सर्वस्तरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. Atpadi Nights Club चा चित्रपट मध्ये असलेला मसाला यामुळे सर्व प्रेक्षकांना आवडणार हे  नक्की.तरी त्यांच्या या  चित्रपटासाठी सर्व चित्रपटतील कलाकारांना Mardmarathi.com कडून हार्दिक शुभेछया.

माहिती share करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *