Disha Bill for Maharashtra देशातील बलात्काराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आंध्र प्रदेशसारखा कठोर कायदा सर्वच राज्यांत व्हायला हवा.हैदराबादमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्याकांडानंतर आंध्रप्रदेश सरकारने बलात्कार विरोधात केलेल्या आंध्र प्रदेश विधानसभेत ‘दिशा विधेयक २०१९’ मंजूर करण्यात आले असून दिशा कायद्याने महिला सुरक्षेला बळ मिळणार आहे.
या कायद्यानुसार बलात्कार प्रकरणातील दोषीला २१ दिवसांत फाशी दिली जाणार आहे. त्याचा दाखला देत महाराष्ट्रातही असा कठोर कायदा करण्यात यावा, अशी विनंती सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. Disha Bill for Maharashtra महाराष्ट्रातही आंध्र प्रदेशप्रमाणे कठोर कायदा करून बलात्कार प्रकरणातील दोषीला १०० दिवसांत फाशी दिली जावी, असा प्रस्ताव शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडला असून त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांकडून यासंदर्भात अहवाल मागितला आहे.
या विनंती ची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. आंध्र प्रदेशने जो कायदा केला आहे, तो राज्यात कशाप्रकारे लागू होऊ शकते यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहवाल आणि मसुदा मागवल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, बलात्काराचे प्रमाण देशात वाढत चालले आहे.Disha Bill for Maharashtra देशात वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे. हा कठोर कायदा प्रत्येक राज्यात लागू झाला पाहिजे. हा कडक कायदा अंमलात आणावा अशी मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी केली आहे.
वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी केली या अभिनेत्रीला केली अटक
दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा करण्यासाठी आंध्र प्रदेशमधील या विधेयकाचा मसुदा मागवून घेण्यातयावा व त्यात गरज असल्यास आवश्यक असे फेरफार करून हे विधेयक हिवाळी अधिवेशनातच मंजूर करून घेण्यात यावे, असेही सरनाईक यांनी पुढे नमूद केले आहे.
सध्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपुर येथे सुरु आहे. जलद कामगिरी केली तर या अधिवेशनातही विधेयक संमत केले जाऊ शकते असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. विधेयकाला मंजुरी दिली तर महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरेल असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
माहिती share करायला विसरू नका