14 डिसेंबर ला डॉ अमोल कोल्हे यांनी “येत्या 18 डिसेंबरला मोठी घोषणा करणार” अशी फेसबुक पोस्ट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्या पोस्त च्या मागील बाजू हि भगव्या रंगाची असल्याने त्यानंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. Dr Amol Kolhe Announcement अनेकांनी ही शिवनेरी किल्ल्यासंदर्भात घोषणा होईल, असा अंदाज लावला होता. तर, कोणी बैलगाडा शर्यतीचा मुद्दा निकाली निघाला असेल, असा तर्क लढवला होता. काहींनी 18 डिसेंबर रोजी शेतकरी कर्जमाफी होईल असा अंदाज वर्तवला आहे.
अमोल कोल्हेंनी फेसबुक पोस्टमधून मोठ्या घोषणेचं सूतोवाच केल्यानंतर चाहत्यांचं १८ डिसेंबर ला काय घोषणा करणार याकडे लक्ष लागून राहिलं होतं.Dr Amol Kolhe Announcement डॉ.अमोल कोल्हे यांनी आपल्या ‘जगदंब क्रिएशन्स’ या निर्मिती संस्थेअंतर्गत एकूण तीन चित्रपट येणार असल्याचं जाहीर केलं.
जगदंब क्रिएशन्स पुढच्या टप्प्यावर चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणार असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. ‘शिवप्रताप’ नावाच्या चित्रपट शृंखले अंतर्गत वाघनखं, वचपा आणि गरुडझेप अशा तीन चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार आहे.Dr Amol Kolhe Announcement हे तिन्ही चित्रपट केवळ मराठीतच नव्हे, तर हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
‘शिवप्रताप वाघनखं’चा पहिला टीझरही या सोहळ्यात लाँच करण्यात आला. हा चित्रपट 6 नोव्हेंबर 2020 च्या मुहूर्तावर प्रदर्शित करणार असल्याचं डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, ‘जगदंब क्रिएशन्स’ बॅनरखाली यापूर्वी बंधमुक्त हे नाटक, एक महानाट्य आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या दोन मालिका करण्यात आलेल्या आहेत. या मालिकेच्या प्रवासात ‘झी मराठी’चे मोठे योगदान असल्याचं डॉ. कोल्हे यांनी सांगितलं.
रात्रीस खेळ चाले 2 मधील शेवंताच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले फोटोज् पाहा..
माहिती share करायला विसरू नका