Dr shriram Lagoo ज्येष्ठ अभिनेते ड़ॉ. श्रीराम लागू याचं वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरीच निधन झाले.गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. Dr shriram Lagoo News लागू यांच्या जाण्याने कलाविश्वातील एक कसलेला अभिनेता, प्रेक्षकांचा हक्काचा ‘नटसम्राट’ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
आयुष्यात अनेक चढ-उतार आल्यानंतरही त्यांनी खचून न जाता प्रत्येक प्रसंगाला तोंड दिलं. अभिनेत्री दीपा लागू या त्यांच्या पत्नी आहेत.१६ नोव्हेंबर १९२७ला त्यांचा जन्म झाला होता. ‘सिंहासन’, ‘पिंजरा’, ‘मुक्ता’ या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. तसंच त्यांच्या अनेक हिंदी चित्रपटातील भूमिकांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. डॉ. लागू यांनी सुमारे १२५हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं आहे. डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीसोबतच बॉलिवूडमध्ये ही एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
पुण्यात डॉ. श्रीराम लागू यांचं शिक्षण झालं. वैद्यकीय महाविद्यालयात असतानाच त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी नाट्य संस्था सुरू केली. त्यांनी कान-नाक-घसा यांच्या शस्त्रक्रियांचं प्रशिक्षण घेतलं आणि पुण्यात कामही केलं. कॅनडा, इंग्लंड येथे ते पुढील शिक्षण घेण्यासाठी गेले. ते वैद्यकीय व्यवसायात असले तरी त्यांना अभिनयाविषयी अधिक आवड होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या डॉक्टरी पेशाला रामराम ठोकत १९६९मध्ये वसंत कानेटकरांच्या ‘येथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
श्रीराम आणि दीपा लागू एक मुलगा देखील होता. पण एका अपघातात त्यांचे निधन झाले होते. तन्वीर लागू यांचं मुंबई-पुणे ट्रेनने प्रवास करत असताना झोपडपट्टीतील एका मुलाने ट्रेनवर दगड मारला. Shriram Lagoo News त्यानंतर त्यामध्ये प्रचंड जखमी झालेले तन्वीर यांचं निधन झालं. श्रीराम लागू यांना यामुऴे मोठा धक्का बसला होता. त्यानंतर २००४ पासून श्रीराम लागू आणि त्यांच्या पत्नीने ज्येष्ठ रंगकर्मीना तन्वीर सन्मान हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली होती.
माहिती share करायला विसरू नका