Farmer Singer like Justin Bieber आपल्या सर्वांना हॉलीवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बिबर माहितीच आहे. त्याच्या ‘बेबी बेबी’ या गाण्यामुळे तो लहान वयातच प्रसिद्धीच्या झोकात अाला. या गाण्याला अनेक वर्ष झाले असले तरी हे गाणे आज पण युवा पिढीच्या तोंडातून ऐकू येत असते. आजपर्यंत अनेकांनी याच गाण्याला जस्टिन बिबर सारखे हुबेहूब गाण्याचा प्रयत्न केला , मात्र खूपच कमी लोकांना त्याच्याप्रमाणे गाणे शक्य झाले. Farmer Singer like Justin Bieber आता भारतातील एका अवलियाने गायलेले हेच गाणे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लुंगी व शर्ट घालून शेतात काम करणाऱ्या व्यक्तीने गायलेले ‘बेबी’ हे खूपच चर्चेत आहे.पहा व्हिडिओ ……..
कर्नाटकमधील चित्रदुर्गा या जिल्ह्यातील हिरीयूर या गावात प्रदीप एच आर नावाचा 26 वर्षीय शेतकरी राहतो. शेतात काम करीत असताना कोणीतरी प्रदीप ला गाणे गायला सांगितले. प्रदीप ने त्या व्यक्तीचे ऐकून चक्क जस्टिन बिबरचे गाणे गायला सुरू केला. शेतात काम करणारा हा शेतकरी अगदी हुबेहूब जस्टिन बिबर सारखे गाताना दिसत आहे. Farmer Singer like Justin Bieber याशिवाय प्रदीप ला आणखीन पण इंग्लिश गाणी देखील मुखपाठ आहेत. आपल्या गाण्यामुळे प्रदीप नेहमीच गावातील लोकांना करमणूक करीत असतो. कोणालाही त्याचे इंग्लिश गाणी समजत नाहीत, तरी सर्वजण त्याच्या गाण्याचा आनंद घेत असतात.
देशाचे लष्कर प्रमुख होणार महाराष्ट्राचे सुपुत्र
प्रदीप ग्रॅज्यूएशन करीत असताना इंग्रजी विषयात नापास झाला. याचेच त्याला जास्त दुःख होते. तेंव्हापासून त्याने इंग्रजी भाषा शिकायचीच असा निर्धार केला. यामुळेच त्याला इंग्लिश गाण्याची आवड झाली. प्रदीप केवळ इंग्लिशच गाणी गात नाही तर तो चायनीज आणि जापनीज गाणी पण गात असतो.
त्याने सांगितले की, मला चाइनीज व जापनीझ भाषा समजत नाहीत, पण त्या भाषेतील गाणे ऐकून ती गाणी गाण्याचा प्रयत्न करीत असतो. काम करताना कानात इअर फोन घालून ऐकल्याने ती गाणी मला पाठ होवून जातात, असे त्याने सांगितले.