Gayatri Datar 2019 वर्ष हे टेलिव्हिजन वरील एका मालिकेसाठी आठवणीत ठेवले जाईल. ती मालिका म्हणजेच “तुला पाहते रे”. या मालिकेने मराठीतील सर्वोच्च टीआरपी गाठण्याचा मान मिळविला. मालिका तसेच मालिकेतील प्रत्येक कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. Gayatri Datar and Dhanshri Kadgaonkar मालिका इतकी लोकांना आवडली की ती संपल्यानंतर प्रेक्षक मालिकेतील कलाकारांना मिस करणे साहजिकच होते.
“तुला पाहते रे” मालिकेतील काही कलाकार आता वेगवेगळ्या मालिकेतून वेगवेगळ्या भूमिकेत दिसून येत आहेत. Gayatri Datar and Dhanshri Kadgaonkar सुबोध भावे- जय जय महाराष्ट्र माझा, जयदीप म्हणजेच आशुतोष गोखले – रंग माझा वेगळा अशा मालिकेत काम करीत आहेत. तसेच सुबोध भावे आणि झेंडे चा अभिनय करणारे उमेश जगताप हे “अश्रूंची झाली फुले” हे नाटक करीत आहेत.
काही दिवसापूर्वी गायत्री दातार हीची डान्स प्रॅक्टिस करतानाची व्हिडिओ वायरल झाली होती. याबद्दल प्रेक्षकांनी अनेक तर्कवितर्क लावले. “तुला पाहते रे” मालिकेतील गोड ईशा म्हणजेच गायत्री दातार ला प्रेक्षकांना परत पाहण्याची खूप इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करीत गायत्री परत एकदा टिव्हीवर दिसून येणार आहे. यावेळी ती वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.
मला पोलिसांनी अटक केली नाही.. अभिनेत्री ने लाईव्ह येऊन केली भावनिक साद
गायत्री ही झी युवा वरील नवीन शो “युवा डान्सिंग क्वीन” या शो मध्ये डान्स करताना दिसेल. या शो मध्ये गायत्री सोबत नंदितवहीनी म्हणजेच धनश्री काडगावकर, पुर्वा शिंदे(जयडी) तसेच अन्य मराठी अभिनेत्री डान्स करताना दिसतील.Gayatri Datar and Dhanshri Kadgaonkar मालिकेचे सूत्रसंचालन अद्वेत दादरकर करेल. तसेच सर्व डान्सर चे परीक्षण छोटी सोनाली कुलकर्णी व नृत्य दिग्दर्शक मयुर वैद्य करतील. गायत्री डान्स वर खूपच मेहनत घेत आहे. ती कसा डान्स करेल हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
माहिती आवडली तर नक्की शेयर करा