काही वर्षांपूर्वी झी मराठीवर आलेल्या “जय मल्हार” या मालिकेतून बानूच्या रूपाने टेलिव्हिजन वर पदार्पण करणाऱ्या ईशा केसकर सध्या तिच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आहे. सध्या ईशा माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत पण काम करताना दिसत आहे. या मालिकेतील तिची शनयाची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे .
संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली मालिका “जय मल्हार” यातूनच तिला प्रसिद्धी मिळाली होती. त्या काळात जय मल्हार मालिका मालिके सोबत काहे दिया परदेस ही मालिका पण खूप चर्चेत होती. त्या मालिकेतील अभिनेता शिव म्हणजेच ऋषी सक्सेना आणि ईशा केसकर यांचे प्रेमसंबंध सर्वांनाच माहिती आहे. दोघे नेहमीच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वर दोघांच्या एकत्र फोटो पोस्ट करीत असतात. दोघांचे प्रेम नेमके कसे सुरू झाले हे जाणून घेऊयात.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ईशा ने त्यांच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली ते सांगितले. चला हवा येऊ द्या च्या सेट वर दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना समोरासमोर पहिलं होत. ऋषीला पहिल्यांदा पाहिल्यास ईशाला तो खूपच शांत वाटला.Isha Keskar Husband त्यावेळी ते एकमेकांना बोलू शकले नव्हते. नंतर झी मराठी अवॉर्ड सोहळ्या दरम्यान दोघे परत एकदा भेटले. यावेळेस दोघांचे एकमेकांशी बोलणे झाले. नंतर ऋषी याला ईशा हिनेच कॉफी साठी पहिल्यांदा विचारले. कॉफी च्या निमित्ताने ईशा आणि ऋषी नेहमी भेटू लागले.
शेवंता अण्णाला घेऊन गेली गोव्याला.. पाहा फोटोज्
त्याच दरम्यान ईशा ने तिच्या मनातील भावना व्यक्त केली होती. पण ऋषी इतक्या लवकर पुढे जाण्यास तयार नव्हता. ईशा त्याला नेहमी विचारायची की तुला कोणी मुलगी भेटली की नाही. पण ऋषी काही उत्तर देत नसे.Isha Keskar Husband नंतर ऋषीनेच स्वतःहुन ईशा समोर आपल्या प्रेमाची कबुली दिली. दोघेही एकमेकांच्या प्रेमाचा आदर करतो असेही ईशा ने सांगितले. तेंव्हा पासून दोघे एकमेकांना डेट करीत आहेत. दोघांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
माहिती आवडली तर शेयर करा.