Mrunal Duranis मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत सुंदर व मोहक अभिनेत्री प्रसिद्ध असलेली मृणाल दुसानीस युवा पिढीसाठी एक आकर्षक व्यक्तिमत्त्व आहे. तिचा गोड चेहरा पाहून कोणी तिच्या प्रेमात पडणार हे नक्कीच. Mrunal Duranis Husband अनेक मालिका, चित्रपट तसेच नाटकांमधून आपल्या दिलखेच अभिनयातून प्रेक्षकांना आपलेसे केले.
बोल्ड लुक दाखवून, अंगप्रदर्शन करूनच पुढे जाता येते अशा विचाराना मृणाल दुसानिस ने सपशेल खोटे ठरविले. तिच्यातील साधेपणाच तिच्या अभिनयातील यशाचा खरा दागिना ठरला. 20 जून 1988 ला नाशिक येथे जन्मलेल्या मृणाल ने आपले शालेय शिक्षण मराठा हायस्कूल येथे पूर्ण केले व नंतर एचटीपी कॉलेज मधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. झी मराठीच्या “माझिया प्रियाला प्रीत कळेना” या मालिकेने तिला अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी मिळवून दिली. नंतर “तू तिथे मी” व “असं सासर सुरेख बाई” या मालिकेतील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांनी खूपच पसंद केले.
25 फेब्रुवारी 2016 ला मृणाल ने अमेरिकेत राहणाऱ्या नीरज मोरे या अमेरिकेत राहणाऱ्या मुलाशी विवाह केला. नीरज चा लुक पाहून तो पण एक अभिनेता वाटतो, पण तो अभिनेता नसून अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. लग्नानंतर मृणाल ने अभिनय क्षेत्रातून काही काळ विश्रांती घेत अमेरिकेला रवाना झाली होती. या कारणाने तिने कलर्स मराठी वरील “असं सासर सुरेख बाई” या चालू असलेल्या मालिकेतून अचानक निरोप घेतला होता.
सध्या मृणाल शशांक केतकर सोबत “हे मन बावरे” ही मालिका करीत असून या मालिका पण प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. असो मृणाल आणि नीरज हे एकत्र खूपच छान दिसतात, हे नक्की. या दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
अण्णा शेवंता च्या गावी जाणार अग्गबाई सासूबाई ची टीम..
माहिती आवडली तर नक्की शेयर करा.