nirbhaya case latest news

Nirbhaya Case Latest News दिल्ली तील 2012 मध्ये झालेल्या निर्भया प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेला होता त्या  निर्भया प्रकरणी फाशीची शिक्षा मिळालेल्या चौघांपैकी आरोपी अक्षय कुमार सिंह याची पुनर्विचार याचिका न्यायानयाने फेटाळून लावली. अन्य दोषींच्या पुनर्विचार याचिका  सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्येच रद्द केल्या होत्या.निर्भया गँगरेप प्रकरणातील चारही दोषींना दया याचिका करण्यासाठी 7 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

पटियाला हाऊस न्यायालयात बुधवारी  झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला . Nirbhaya Case Latest News न्यायालयाने सांगितलं की ‘आम्ही तुम्हाला (दोषींना) 7 जानेवारीपर्यंतचा वेळ देत आहोत. तुम्हाला  जे कुठले न्यायालयीन किंवा दया याचिकेसारखे पर्याय तपासायचे असतील तर तुम्ही ते करु शकता’ .

या न्याायालयाच्या या निर्णयानंतर निर्भयाच्या आईला न्यायालयातच अश्रू अनावर झाले. त्यांच्याजवळ सर्व अधिकार आहेत, पण आमचं काय? असा सवाल त्यांनी न्यायालयाला विचारला.न्यायालयाने आरोपींना दया याचिका करण्यासाठी मुदत दिली. न्यायालय फक्त आरोपींचे अधिकार बघत आहेत आणि आमचे नाही. पुढील सुनावणीच्या दिवशीही निकाल दिला जाईल याची काहीही शाश्वती नाही, असंही त्या म्हणाल्या.

दोषी अक्षय कुमार सिंहच्या वकिलाने न्यायालयात सांगितलं की, अक्षय राष्ट्रपतींसमोर दया याचिका दाखल करु इच्छितो. त्यासाठी वकिलाने तीन आठवड्यांचा अवधी मागितला. मात्र केंद्र सरकारच्या वकिलाने याचा विरोध केला. यासाठी फक्त एक आठवड्याचा अवधी दिला जाऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं. त्यावर “आरोपी कायद्यानुसार देण्यात आलेल्या वेळेतच दया याचिका दाखल करु शकतात”, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. आता चारही दोषींना 7 जानेवारी पर्यंत दया याचिका दाखल करण्याची मुदत देण्यात आलेली आहे.

डॉ अमोल कोल्हे नी केली हि घोषणा……

माहिती share करायला विसरू नका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *