Nirbhaya case latest news दिल्लीत चालत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला होता त्याचे पडसाद देशभर उमटले होते त्यानंतर उपचारांसाठी दिल्लीतील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. Nirbhaya case latest news परंतू उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात एकूण सहा जण दोषी होते. ज्या पैकी एकजण अल्पवयीन होता . एका दोषी ठरलेल्या राम सिंह याने तिहार तुरुंगामध्ये आत्महत्या केली. यानंतर चार दोषींना दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाविरोधात दोषींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांची पुनर्विचार याचिका न्यायलयाने फेटाळून लावली.
या आरोपींना लवकरच फाशी होण्याची शक्यता आहे. बिहारच्या बक्सर कारागृहाला या आठवड्याच्या शेवटपर्यंत १० फाशीचे दोरखंड तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपी अक्षय कुमारने उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली दरम्यान या अक्षय कुमार आरोपींचे सुनावणी दरम्यानचे धक्कादायक विधान समोर आले आहे.
नरेंद्र मोदींना पर्याय कोण ? –शरद पवारांचं उत्तर
“दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी धोक्याच्या स्तरावर गेली आहे. हवा प्रदुषणामुळे दिल्लीची अवस्था गॅस चेंबरसारखी झाली आहे. इतकंच नाही तर दिल्लीतील पाण्यात देखील विष मिसळलं जात आहे. हे वास्तव सरकारने नुकत्याच संसदेत सादर केलेल्या अहवालातून सिद्ध झालं आहे. दिल्लीत हवा आणि पाण्याबाबत काय घडत आहे याविषयी सर्वांनाच कल्पना आहे. यामुळे आधीच आयुष्य अत्यंत कमीकमी होत आहे. अशा स्थितीत फाशीच्या शिक्षेची गरज काय?”
फक्त बिहारच्या बक्सर कारागृहाकडेच फाशीचा दोरखंड बनवण्याचा अधिकार आहे. गेल्या अठवड्यात हे दोरखंड बनवण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान, बक्सर कारागृहाचे अधिक्षक विजय कुमार यांच्या सांगण्यानुसार, ‘गेल्या आठवड्यात कारागृह संचालनालयकडून १४ डिसेंबर पर्यंत १० फाशीचे दोरखंड तयार करण्यासाठी निर्देश मिळाले होते.या प्रकरणातील दोषींना फाशी होवू शकते.