Nirbhaya Latest News दिल्लीतील निर्भयावर डिसेंबर 2012 मध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या करण्यात आली होती. या निर्भया प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देश्बाहर उमटले होते. या प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये अक्षय, मुकेश, पवन आणि विनय या चौघांना या प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. Nirbhaya case Latest News यातील आणखी एक आरोपी राम सिंहने तिहार तुरुंगात कथितरित्या आत्महत्या केली. मुकेश, पवन आणि विनयने गतवर्षी शिक्षेवर फेरविचार याचिका दाखल केल्या होत्या. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने त्या सर्वच फेटाळून लावल्या.
यामध्ये एक फेरविचार याचिका निर्भयाच्या दोषींपैकी एक अक्षयने दाखल केली होती. त्याने याचिकेत दिल्लीतील प्रदूषणामुळे असाही मृत्यू होणार, मग फाशी काय द्यायची असा सवाल केला होता. त्त्यासाठी त्याने सरकारच्या म्हणण्याचा आधार घेतला होता व त्याने आपल्या याचिकेत अशाच प्रकारचे विचित्र युक्तिवाद मांडले आहेत. दिल्लीत राहणे गॅस चेंबरसारखे आहे, सतयुग-कलियुग, महात्मा गांधी, अहिंसा, जगभरातील शोधांचा निष्कर्श इत्यादींचा दाखला फाशीपासून वाचण्यासाठी दिला होता.
देशाचे लष्कर प्रमुख होणार महाराष्ट्राचे सुपुत्र
या निर्भया प्रकरणातील दोषींच्या फेरविचार याचिकेवर सुनावणीतून बाहेर पडण्याचा सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी निर्णय घेतला असून निर्भयाच्या आईकडून माझ्या एका नातेवाइकाने शिफारस केल्यामुळे, माझ्या खंडपीठा ऐवजी दुसऱ्या एखाद्या खंडपीठाकडून ही सुनावणी घेण्यात यावी. Nirbhaya case Latest News यासाठी आम्ही एक नवीन खंडपीठ स्थापित करणार असल्याचेही सरन्यायाधीश म्हणाले आहेत. बुधवारी सकाळी 10:30 वाजता हे नवीन खंडपीठ या फेर विचार याचिकेची सुनावणी घेणार आहे.सर न्यायाधीश शरद बोबडे हे बाहेर पडणार आहेत.
माहिती share करायला विसरू नका