Onion News in marathi

Onion News सगळीकडे कांद्याच्या अवाढव्य किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले असतानाच, एक कर्जबाजारी शेतकरी याच कांद्यामुळे करोडपती झाला आहे. त्या शेतकऱ्याचे नाव मल्लिकार्जुन असून तो कर्नाटकमधील रहिवासी आहे. Onion new Newsचित्रदुर्ग जिल्ह्यातील डोड्डासिद्वावनहल्ली या गावातील या शेतकऱ्याने कांद्याच्या वाढत्या किंमतीचा फायदा घेत मल्लिकार्जुन महिनाभरातच करोडपती झाले. मल्लिकार्जुन आता तेथील परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श बनले असून, लोक आता त्यांच्याकडे शेती बद्दल टिप्स घेऊन जात आहेत.

Onion latest News

42 वर्षीय मल्लिकार्जुन यांनी कांद्याची शेती करण्यासाठी कर्ज काढले होते. हे कर्ज काढून मी खूप चिंतेत होतो. जर हे पीक वाया गेले असते तर, मी खूप अडचणीत सापडलो असतो. परंतु, असे काहीच झाले नाही. उलट याच कांद्यामुळे माझे व माझ्या कुटुंबाचे भाग्यच बदलून टाकले आहे, अशा भावना मल्लिकार्जुन यांनी व्यक्त केल्या. मल्लिकार्जुन यांनी तब्बल 240 टन इतका कांदा पिकविला होता. मागे जेंव्हा कांदा 200 रुपये प्रति किलो ने विकला जात होता, त्यावेळेस त्यांना खूपच फायदा झाला. परंतु, त्यांनी गुंतवलेल्या 15 लाख रुपयांवर त्यांना जास्तीत जास्त 5-10 लाख रुपयांचा फायदा होईल, असा त्यांचा अनुमान होता.Onion News in marathi मात्र त्यापेक्षा किती तरी जास्त पटीने त्यांना फायदा झाला व ते करोडपती झाले.

भारतात या ठिकाणी कांदा फक्त १५ रु किलो

mallikarjun Onion News in marathi

मल्लिकार्जुन यांच्याकडे 10 एक्कर शेतीची जमीन असून त्यांनी शेतीसाठी कामावर 50 मजूर ठेवले आहेत. सन 2004 पासून त्यांनी कांदा उत्पादनाकडे लक्ष दिले असून ते प्रत्येक पावसाळ्यात कांद्याचेच पीक घेत असतात.

माहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published.